प्रकाशा नदीपात्रात ब्यारेजचे दरवाजे बंद झाल्याने मासेमारीसाठी मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांची गर्दी.. नंदुरबार : सत्यप्रकाश न्यूज मागील गेल्या महिनाभरापासून मध्यंतरीच्या काळात तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. यामुळे तापी नदीचा पुर कायम राहिला आहे. तापी नदीला पूर आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडन्यात आले होते परंतु,आता दरवाजे बंद करण्यात आले असल्याने नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा बॅरेजच्या पुढे पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे आता मच्छीमारांची गर्दी झालेली दिसून येत आहे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे मागील 15 दिवसांपासून उघडण्यात आले होते. प्रकाशा येथील चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने पाणी बाहेर पडत होते. दरम्यान पाऊस कमी झाल्याने आणि हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने बॅरेज प्रकल्पांना दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने हे दरवाजे बंद झाल्यानंतर काही वेळातच प्रकाशा येथील तापी नदीच्या पात्रात मच्छीमार बांधवांची झुंबड उडाली होती. नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मिळण्याची शक्यता असल्याने एकाचवेळी अनेक जण जाळं घेत पाण्यात उतरले होते. यातून प्रकाशा पुलावरुन नदीपात्रात मच्छीमारांची शाळाच भरल्यासारखे दिसून आले. यातून अनेक मच्छीमारांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
Tags:
नैसर्गिक