राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारतांना शिक्षकांचे मन परिवर्तन गरजेचे - प्राचार्य डॉ. लता मोरे........

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारतांना शिक्षकांचे मन परिवर्तन गरजेचे.. प्राचार्य डॉ लता मोरे
नवापूर येथे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी संपन्न
नवापूर- सत्यप्रकाश न्युज 
नवापूर येथील श्री सुरुपसिग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी संपन्न झाला.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारतांना शिक्षकांचे मन परिवर्तन गरजेचे आहे. त्याशिवाय आत्मनिर्भर भारत निर्माण होणार नाही . नवोपक्रम आधारित ज्ञान प्रत्येक शिक्षकांनी स्वीकारल्यास खऱ्या अर्थाने हे धोरण तळा गळापर्यंत पोहचेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ लता मोरे यांनी केले. सर्व प्रशिक्षक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या प्रसंगी उपस्थिती दिली.सदर कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख डॉ पुष्पा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ संजय अहिरे, डॉ  जगदीश काळे, डॉ गौरी पाटील, डॉ मंदा मोरे, डॉ किशोर सोनवणे,डॉ नितीनकुमार माळी प्रा फिलिप , आनंद गावित, सुरज गावित, अनिल गावित, दिलीप वसावे, राजेंद्र पावरा, विलास पवार, धीरज माळी, शारदा गावित, कविता चौधरी, दिपाली चौधरी, रविता गावित अंजलीन कुवर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ पुष्पा पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post