विशाखा समिती तर्फे मेहंदी स्पर्धेचे आयोजन...........

विशाखा समिती तर्फे मेहंदी स्पर्धेचे आयोजन...........
        नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हाईस्कूल व जूनियर कॉलेज    नवापूर  येथे विशाखा समिती अंतर्गत शालेय विद्यर्थिन्नीसाठी धार्मिक व पारंपरिक सण हरितालिका निमित्त मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. इयत्ता ९ वी ते १० वी पाहिला गट होता,यात १५ विद्यर्थिंनिनी सहभाग घेतला तर इयत्ता११ वी ते १२ वी चा दुसरा  गटात २१विद्यर्थिंनिनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेसाठी मेहंदी विद्यर्थिनिंनी स्वतः आणली होती. वेळ १ तास देण्यात आला होता.अत्यंत सुबक डिजाईन हाताच्या दोन्ही बाज़ुंना त्यांच्या शालेय मैत्रिणीच्या हाथावर क़ाढण्यात आल्या होत्या. सदर  स्पर्धेचें नियोजन मुलींमधील मेहंदीची आवड  जोपासण्यासाठी  शिक्षिका श्रीमती जयश्री चव्हाण,श्रीमती मिनल पाटील,श्रीमती वंदना पाटील व श्रीमती कविता खैरनार यांनी केले .अत्यंत उत्साहात व आनंदाने विद्यर्थिनी सहभागी झाल्या  होत्या.
  पहिल्या गटात प्रथम क्रमांक कु निकिता लक्ष्मण भोई.
  द्वितीय क्रमांक कु शुभांगी विट्ठल गावीत ,तृतीय क्रमांक क़ु स्मीता विजय गावीत यांनी पटकावला.
तर द्वितीय गटात प्रथम क्रमांक क़ु प्रतिक्षा सूदाम गावीत, द्वितीय क्रमांक कु सिद्धी संजय पाटील तर तृतीय क्रमांक सलोनी संदीप मावची यांनी पटकावला.
सदर स्पर्धेचें परीक्षण श्रीमती मेघा पाटील,श्रीमती भावना पाटील व श्रीमती प्रतिभा पगार यांनी केले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन प्राचार्य श्री मिलिंद वाघ व पर्यवेकक्षक श्री दिपक मंडलिक यांनी केले.विद्यार्थ्यंlच्या कलागुणांना वाव मिळावा , त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post