एअर मार्शल व्ही.ए.पाटकर
विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.........
नंदुरबार, दि.26 (जिमाका वृत्तसेवा) : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकडून एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
एअर मार्शल व्ही.ए. पाटकर गौरव पुरस्काराच्या 5 हजार रुपयांचा लाभ घेण्याकरीता इच्छुकांनी अर्जासोबत माजी सैनिक विधवांचे हस्तलिखीत अर्ज, डी.डी. 40 फॉर्म, विधवांचे ओळखपत्र, दहावी व बारावी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, गुण पत्रकांची छायांकीत प्रतीसह अर्ज 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
Tags:
सामाजिक