नवापूर येथील किक बॉक्सिंग च्या विद्यार्थ्यांना वनिता विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न........
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन व इंडियन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन 7 ऑगस्ट 2022 रोजी मिशन हायस्कूल नंदुरबार येथे करण्यात आले होते. किक बॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याभरातून जवळपास 181 खेळाडू मूला मुलींनी सहभाग घेतला होता त्यात नवापूर येथील एकूण 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात त्यांनी भरिव असी कामगिरी करत खालील प्रमाणे पदक व सर्टिफिकेट मिळवले आहेत
१नक्षत्रा पाटील गोल्ड मेडल
२ जानवी शिनकर गोल्ड मेडल
३ प्रांजल पाटील गोल्ड मेडल
४ युविका पराडके गोल्ड मेडल
५ रितिका शर्मा गोल्ड मेडल
६ प्रचिती गावित गोल्ड मेडल
७ दिपल नगराळे गोल्ड मेडल
१ मानसी शिनकर सिल्वर मेडल
२ वेदांत वळवी सिल्वर मेडल
३ मनस्वी शर्मा सिल्वर मेडल
१ गुंजन शर्मा ब्रांझ मेडल
वरील सर्व खेळाडूंना नवापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री नरेंद्र नगराळे तसेच साप्ताहिक रंगवली वार्ताचे संपादक श्री गणेश वडनेरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले
त्याप्रसंगी जिल्हा किक बॉक्सिंग असो.चे अध्यक्ष संतोष मराठे सर सचिव गणेश मराठे सर .मुख्य प्रशिक्षिका स्वयंसिध्दा असोसिएशन नवापूर चा मार्शल आर्ट श्रीमती ज्योती चौधरी मॅडम कल्पित नाईक स्पर्धेचे पंच पवन बिराडे, उपस्थित होते
Tags:
क्रिडा