शाडूच्या गणेशमुर्तीतून समाजप्रबोधन-
आपल्या कला कौशल्याने सौ.संगिता साळूंखे शाडूच्या गणेशमुर्ती साकारून करत आहेत समाज प्रबोधन-नवापूर सत्यप्रकाश न्युज
कला ही प्रत्येकात उपजत असावी लागते असे म्हटले जाते,ती ओढून ताणून प्राप्त करता येत नाही. मात्र जी कला आहे ती वृध्दींगत होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण ही खरी आहे फक्त त्यासाठी मुलांकडे बघण्याचा डोळसपणा असावा लागतो. असेच काही
सौ.संगिता राजेंद्र साळूंखे - मारवडकर
श्री.राजेंद्र बळवंत साळूंखे-क्रिडा शिक्षक
श्री.शिवाजी हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज,नवापूर जि.नंदुरबार यांच्या त्या धर्मपत्नी. यांच्या बाबतीत झालेय.बालपणी त्यांनी कलाकुसरीचा छंद असेल,परंतू लग्नानंतर ब-याच वर्षांनी पुन्हा त्यांना परमेश्वराने शाडूच्या गणेशमुर्ती बनविण्याच्या माध्यमातून समाजजागृती करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
मागील चार वर्षाला अचानक मातीच्या गणपती मुर्ती बनवण्याचे त्यांच्या मनात आले....
आणि त्यांनी प्रथम काळ्या मातीच्या गोळ्याला बाप्पाचा आकार देण्यास सुरूवात केली.बघता बघता खूप छान मुर्तीने आकार घेतला,ते पाहिल्या नंतर त्यांच्या
मनाला उभारी मिळाली ...
व मागच्या वर्षापासून अनेक शाडूच्या मातीच्या मुर्ती तयार होऊ लागल्या..
त्यांची कारागिरी पाहून खरोखर कौतुक वाटते, गणेशाच्या मुर्तीच्या विविध आकारापासून ते मुकुटावरील बारीकसारीक कोरीव काम,तसेच सर्व दागिने प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक आणि सुबक सुंदर उतरत आहे.... शिवाय रंगकामही त्या स्वतः करत असतात. म्हणतात ना की कलेला मोल नसते परंतु त्याची जाण असणारे, पारखी नजर असणारे अजून खूप कमी आहेत.
काही गणेशभक्त अगोदरच कशी मुर्ती बनवायची याचे फोटो देवून जातात. त्या हुबेहुब तशीच मुर्ती साकारून देतात. भक्तांना आपल्या मनाजोगी मुर्ती पाहून खूप आनंद होतो.
अनेक गणेश भक्तांना त्यांनी शाडूच्या मातीच्या मुर्ती घेण्यास प्रवृत्त केले,पर्यावरण पूरकविषयी जनजागृती करून पर्यावरण पूरकचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले.
या वर्षी शाडूच्या मुर्तीं गणेश भक्तांच्या पसंतीस उतरले.अनेक भक्तांकडून होता आहे मागणी.व पुढील वर्षासाठी आताच बुकींग करत आहेत.
त्यांना या कार्यासाठी कुटूंबातील लहान मोठे सदस्य प्रोत्साहन देत आहेत.
व सर्वत्र त्यांच्या कलेचे कौतुक केले जातेय की महिला असुन देखिल आपल्या कलेतून त्या लोकांना पर्यावरण पुरक संदेश देत आहेत.
श्री.राजेंद्र बळवंत साळूंखे-क्रिडा शिक्षक
श्री.शिवाजी हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज,नवापूर यांच्या त्या धर्मपत्नी आहेत
पर्यावरण रक्षण-
मातीची गणपती मुर्तीच करा स्थापन.....
घरीच पाण्याच्या टपात करा विसर्जन ....
संपर्कासाठी पत्ता सौ.संगिता राजेंद्र साळूंखे
४१४-जनता पार्क मार्ग क्र.८
नवापूर जि.नंदुरबार
मोबा.क्र.9420852290/75070 36629 ,सौ.जया नेरे,नवापुर जि.नंदुरबार
9423918363
Tags:
कलाविष्कार