अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे भरत गावित, तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न.......

अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे भरत गावित, तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न--
नवापूर- सत्यप्रकाश न्यूज 
     भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अनुषंगाने नवापूर तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरणसह उत्स्फूर्त व प्रचंड यशस्वी तिरंगा यात्रासाठी सहकार्य करणार्‍या ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांचे आभार मानण्याचा ऋणनिर्देश कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी घेण्यात आला. सर्वच मान्यवरांनी घेण्यात आलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी पिढीला देशभक्तीपर धडा देणारे आणी स्वातंत्र्य संग्रामातील सर्वस्व अर्पण करणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांना खऱ्या अर्थाने गौरव करून मानवंदना देणारे असल्याचे गौरवोद्गार काढले. 
नवापूर तालुका प्रशासन आणि दैनिक पत्रकार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत  देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धा  एक ऑगष्ट 2022 ला नगर परिषदे च्या टाऊन हॉल येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली होती. तर नवापूर तालुका प्रशासन व जोशोबा सरकार युवा मंडळा तर्फे शाळा व महाविद्यालयात निबंध वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा तसेच महिला मंडळातर्फे भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस दल, तालुका प्रशासन आणि दैनिक पत्रकार संस्था च्या संयुक्त विद्यमाने दि 12 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक तिरंगा यात्रा संपन्न झाली होती. त्यात सहभाग नोंदवलेले तसेच सहकार्य करणार्‍यांचा ऋण निर्देश समारंभ तहसील कार्यालय आवारात दि 15 ऑगष्ट रोजी ध्वजवंदन पश्चात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष भरत माणिकराव  गावित तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील, उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, तहसीलदार मंदार कुळकर्णी, पालिका  मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले, सचिव महेंद्र जाधव, राहुल टीभे, धर्मेश ग्यानचंदाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कु. झरिन सलीम पठाण या विद्यार्थिनीने आपल्या सुरेल आवाजात "ए मेरे वतन के लोगो", हे देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात तहसिलदार मंदार  कुलकर्णी म्हणाले आपण अमृत महोत्सव  साजरा करत आहोत खरोखरच आपण भाग्यवान आहोत, आम्हाला रजत जयंती साजरा करतांना जो अनुभव आला त्याचा उपयोग आज झाला पुढे आपण शतकोत्तर जयंती साजरा करू त्यावेळेस आपल्याला हा अनुभव कामात येईल कदाचित त्यावेळेस आपण एक अधिकारी किंवा नेता म्हणून व्यासपीठावर उपस्थित असाल आणि एक चांगल्या प्रकारे नियोजन कराल अशी अपेक्षा उपस्थित विजेता विद्यार्थ्यांकडून करून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
    तर आपल्या अध्यक्षीय भाषणात भरतभाऊ गावीत यावेळेस विजेता स्पर्धकांचे अभिनंदन करून येणाऱ्या डिसेंबर महिन्यात दादासाहेब माणिकराव गावित शिक्षण प्रसारक संस्थे तर्फे स्व.हेमलताताई वळवी यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी सराव करायचा आहे तालुका प्रशासन सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांचे या कामाचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते देशभक्तीपर गीत गायन-नृत्य, वकृत्व, निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी अश्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्रत्येकी तीन  विजेत्या स्पर्धक  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शिल्ड व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच तिरंगा यात्रेत सहभागी शाळा, महाविद्यालय व  सहकार्य करणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
गीत गायन स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक- श्री शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी विश्वजीत रवींद्र बागुल, द्वितीय क्रमांक एस एम चोखावाला लिटल एंजल्स स्कूलचा विद्यार्थी शौर्य भावीन पाटील, तृतीय क्रमांक वनिता विद्यालयाची कु. स्नेहल रामदास भांडेकर, मोठ्या गटात- प्रथम क्रमांक डी जी अग्रवाल मेमोरियल शाळेचे शिक्षक प्रशांत बळीराम सोनवणे, द्वितीय क्रमांक राज महेंद्र चव्हाण, त्रृतीय क्रमांक कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका कु. ज्योती जगन्नाथ कापुरे व सार्वजनिक गुजराथी हायस्कूलची विद्यार्थिनी कु. झरीन सलीम पठाण. तसेच नृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स शाळा, द्वितीय क्रमांक सार्वजनिक मराठी हायस्कूल आणी तृतीय क्रमांक सार्वजनिक गुजराथी हायस्कूल व नेशनल उर्दू हायस्कूल यांना मिळाला. नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्री शिवाजी हायस्कूल, द्वितीय क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, व  त्रृतीय क्रमांक सार्वजनिक गुजराथी हायस्कूल या शाळेला मिळाला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हेमंतभाई शाह,  भटू जाधव, रमेश पानपाटील, नारायण मराठे, भानुदास रमोळे, राहुल खैरनार व कु. हेमलता साळुंखे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक तहसीलदार मंदार कुलकर्णी, सूत्र संचालन गणेश महाजन तर आभार नितीनकुमार माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले, सचिव उपाध्यक्ष प्रकश खैरनार, महेंद्र जाधव,  कोषाध्यक्ष प्रेमेंद्र पाटील, सल्लागार प्रा.डॉ आय. जी. पठाण, सदस्य निलमकुमार पाठक, विनायक सूर्यवंशी, हेमंत पाटील, निलेश पाटील, सुधीर निकम, महेंद्र चव्हाण, हेमंत,जाधव, हरीश तांबोळी, जयंती गारोळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post