वरिष्ठ महाविद्यालयाचा एकाच वेळेस दोन कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार.............

       मनोज चौधरी      राजेंद्र जाधव 
नवापूर, वरिष्ठ महाविद्यालयात एकाच वेळेस दोन कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार
नवापूर: सत्यप्रकाश न्युज 
   येथिल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्री मनोज काळू चौधरी व ग्रंथालय परिचर श्री राजेंद्र गंगाराम जाधव यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे शैक्षणिक वर्ष 2019-2020 साठीचा श्री मनोज चौधरी यांना गट ब वर्ग दोन मधून उत्कृष्ट अधिकारी चा व श्री राजेंद्र जाधव यांना गट क वर्ग चार मधून उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा असे दुहेरी पुरस्कार जाहीर झालेले आहेत. 
     विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाविषयी माहिती, सुविधा, प्रतवारी व विविध उपाययोजना व त्यांची उपयोगिता आणि राबविण्यात आलेले विविध उपक्रम इत्यादी बाबी विचारात घेता विद्यापीठाने या दोघांची पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.
  महाविद्यालयातील एकाच वेळेस दोन कर्मचाऱ्यांना विद्यापीठ स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री. सुरूपसिंगजी नाईक, कार्याध्यक्ष व विद्यमान आमदार श्री. शिरीष कुमार नाईक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून दोन्ही कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाने, डॉ. श्रीमती एम. ए. गावित, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री चौधरी व श्री जाधव यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.

Post a Comment

Previous Post Next Post