दोंडाईचा शिंपी समाजाच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा........

दोंडाईचा शिंपी समाजाच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा    
दोंडाईचा सत्यप्रकाश न्युज 
   शिंपी समाज संस्थेच्या वतीने मालपुर रोडवरील समाज मंगलकार्यालय च्या जागेवर भारताच्या अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.    त्यानुसार  दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी  9 वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर राष्ट्रध्वज उभारण्यात येवुन शिंपी समाजाचे सेवानिवृत्त फौजी श्री किरण कापडे यांच्या उपस्थितीत   तिरंगा उभारून  राष्ट्रगीत म्हणून सलामी देण्यात आली त्यावेळी अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी सचिव श्री चंद्रकांत कापुरे सल्लागार प्रा.प्रकाश भांडारकर श्री सुकलाल जगताप जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल माजी उपाध्यक्ष श्री मनोज मेटकर श्री कन्हैयालाल जगदाळे युवक अध्यक्ष श्री सागर पवार उपाध्यक्ष श्री योगेश बोरसे माजी युवा अध्यक्ष श्री सतिश जाधव श्री देवेन्द्र गंवळे श्री निलेश चित्ते महिला अध्यक्षा सौ भारतीताई जगताप अ.भा. महिला आघाडीच्या सह कोषाध्यक्ष सौ वंदनाताई भांडारकर ,सौ.सुवर्णा कापडे तसेच श्री तुळशिराम जगताप  श्री रविन्द्र जाधव सर श्री अशोक जगताप श्री सुरेश जगताप श्री रविन्द्र जगताप श्री अरूण पवार उपस्थित होते.


 
 

Post a Comment

Previous Post Next Post