संपादक- सत्यप्रकाश न्युज
१५ ऑगस्ट २०२२. आज आपला भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पुर्ण करीत आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अतिशय आनंदात व उत्साहात आहे. देश व मातृभूमी विषयीची आस्था असणे खूप महत्त्वाचे आहे.
आपल्या भारत देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे, देशाला स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आहे, दीडशे वर्ष पारतंत्र्य व त्यातून मुक्ततेसाठीचा संघर्ष खूप मोठा आहे. अनेक महान व्यक्तींनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. आज २०२२ या अमृत महोत्सवी वर्ष पुर्ण करीत असताना भारत देशाने खूप काही कमावले आहे .
ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केलेली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण अशा असंख्य क्षेत्रातले आपल्या भारत देशाचे यश लक्षणीय आहे. सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे.
आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही हे जगण्याचे एक सर्वोच्च मूल्य आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. अमृत महोत्सवी वर्ष हा आपल्या भारत देशासाठी खूप मोठा टप्पा आहे. यात प्रथम पारतंत्र्यातून मुक्त होऊन नंतर नव्या भारताच्या उभारणीचा मार्ग व प्रयत्न आहेत.
जगाला कवेत घेण्याची क्षमता भारत देशाकडे आहे. आज नवनिर्माणाच्या नव्या दिशा आपण शोधलेल्या आहेत. आपल्या संस्कृतीचा उद्घोष करून आपण समृद्धीची शिखरे चढत चाललो आहोत.
१५ ऑगस्ट हमे है प्यारा,
आजादी का पर्व यह न्यारा,
मुट्ठी में आकाश कर लिया सारा,
यश गाता है यह जग सारा.
प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे स्वतःचे प्रतीक किंवा चिन्ह असते. ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. राष्ट्रध्वज हे प्रत्येक राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ज्याला तिरंगा म्हणतात. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयांसाठी त्याचे खूप महत्व आहे.
सर्व भारतीयांनी आपल्या अयुष्यात तिरंगा फडकवला असेलच, विशेषतः स्वातंत्र्यदिन आणी प्रजासताक दिना निमित, यावर्षी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरी करत आहे.
त्यानिमिताने यावेळी भारत सरकारतर्फे तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतगर्त देशातील २० कोटींहून अधिक घरांमध्ये लोक सहभागातून तिरंगा फडकवला जाणार आहे. आमच्यासाठी तिरंगा हा खुप महत्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस त्या वीरांच्या गाथा आणि बलिदानाचे प्रतीक आहे ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशभरात राष्ट्रध्वज फडकवला जावा हेच आमचे ध्येय असले पाहिजे. ध्वजारोहण सर्व निवासस्थाने, शासकीय व निमसकारी कार्यालये आणि व्यावसायिक औद्योगिक संस्था, इतर आस्थापना, कार्यालये, सर्व अमृत सरीवरांवर ध्वजारोहण केले जावे.
ही मोहीम नागरिकांच्या हृदयात देशभक्तिची भावना निर्माण करण्या बरोबरच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचे काम करेल. 'हर घर तिरंगा' मोहिमेचा मुख्य उधेश्य प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे हा आहे.
हर घर तिरंगा.🇮🇳🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार, नाशिक