स्वातंत्र्याची ७५ वर्षे
. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारत देशाची संस्कृती खुप प्राचिन आहे. 'देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास खुप मोठा आहे. १५० वर्षे पारतंत्र्य व त्यातून मुक्ततेसाठीचा संघर्ष खुप मोठा आहे अनेक महत्वाच्या व्यक्तितीनी केलेल्या बलिदानाचे सार्थक झाले आणि भारताले पारतंत्र्यातून मुक्तता मिळाली.
आज स्वातंत्र्याचा प्रवास ७५ वर्षाचा झाला भारत देशाने खूप प्रगती केली आहे. था ७५ वर्षात ज्ञान, विज्ञान कृषी, आरोग्य, व्याकर, दळणवळण, शिक्षण, कृषी, आरोग्य, संशोधन, संरक्षण अशा देशाचे यश लक्ष्णीय आहे. असंख्य क्षेत्रात आपल्या भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली अनेक वर्षे साहित्य, क्रिडा, संस्कृती या क्षेत्रामुळे नामवंत साहित्यीक आणि कलावंतांनी आपला अगणित ठसा उमटवला आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतिचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे भाषांचे लोक येथे एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नुकाराम, यांच्या सारख्याच थोर संताची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आहे.
भारत देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. तरिहि आज आपल्या स्वतंत्र भारतात स्त्री ही स्वतंत्र झाली का ?हा प्रश्न आपण आज विचारात घ्यायलाच पाहिजे स्रीला मातेचा दर्जा दिला जाणागया भारत देशात अजूनही स्री वर अन्याय अत्याचार होतात. तीला अजूनही मानाचा दर्जा दिला जात नाहीय. असे आपल्या निदर्शनास येते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. अनेक शूर विरांनी आपल्या जीवाचे बलीदान दिले
रक्ताच्या नदया सांडल्या, आज मात्र हया स्वतंत्र भारताने एकाच आईची लेकरे एकमेकांच्या जतनासाठी नवाजलेली आहेत. धर्माच्या नावावरून जातिय दंगली होतात. देशात दहशतवादी हल्ले होतात. सारयामध्ये मात्र माणुसच भरडला जात आहे. जी माणस यात होरपळली जात आहेत ती मात्र भारतीयच आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
चंद्रशेखर आझाद, सुखदेव राजगुरु यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मात्र आपल्या देशात भ्रष्टाचार फोफावला आहे संतांची भूमी असलेल्या था ब समाजाना किड लागत आहे. नितीमत्ता दिवसेंदिवस ढासक आहे. अनेक अधिकाऱ्यांना भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली अटक होत आहे अनेक घोटाळे समोर 'येन आहेत. ज्यांच्या हाती आपण आपल्या देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे, तेच भ्रष्टाचारात बरबटलेले पाहुन असेच्या वेदना होतात.
एकेकाळी 'सुजलाम सुफलाम' असलेला आपला देश प्रदुषणाचा विळख्यात अडकत चालला आहे आपणच भारतीय नागरिक नैतिक जबाबदारी विसरत चाललो आहोत. आज आपल्या प्रदुषणा आरख्या भिषण समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत. दिवसेंदिवस नैसर्गिक संसाधनांचा होणारा -हास आपण उघडया डोळ्यांनी बघत आहोत. स्वातंत्र्याची७५ वर्षे उलटली तरीही या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला आणि 'गुरुरब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा अशा उच्च स्थानी असलेल्या शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागत आहे.
आज आपल्या देशाची तरुण पिढी जी
देशाचे भवितव्य ठरणार आहे तिच आज व्यसनाधीन होत आहे अशी पिढी आपल्या देशाचे कसे उज्ज्वल करणार असा सवाल उठत आहे.
या तरुणांकडे पाहिल्यावर असे वाटते की, अवघ्या चौदाव्या वर्षी आपल्या शरिरांवर गोळि खाणारे शिरीष कुमार यांचे 'आदर्श हि तरुन पिढीवर केव्हा होणार या तरूण पिढीला दुष्ट प्रवृत्तीमुळे 'देश' शोकग्रस्त होत आहे. चालला आहे.
शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या भारताचे भविष्य कसे असणार आहे आपल्या देशाच्या स्वातंत्राने एवढया हाल का सहन केले एवढे मोठे बलीदान दिले ते कार्य कमी होते की काय? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत
परंतु जो असमाधानाचा असंतोषाचा सूर निघत आहे जबाबदार आहोत. आपली आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक प्रगती झाली पण त्यांचा -हास झालेला आपल्याला स्पष्ट दिसत आहे. एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने झपाटयाने परिवर्तन करीत आहोत परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या भौतिक अभौतिक समस्यांच्या दृष्ट विळ्यात आपण अडकल्याने खातंत्र्याचा श्वास गुदमरतोय.. म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने देशातील जनतेला एवढेच आवाहन करता येईल की 'सत्यमेव जयते' च्या ब्रीद वाक्याची काय पुन्हा एकदा आपला देश 'सुजलाम सुफलाम' क्या होईल यासाठी प्रत्येकाने झटून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
लेखिका - प्रा. अर्चना प्रभाकर आमोदे
आदर्श कन्या विद्या विदयालय