पालकांनी कुठलाही अट्टाहास न करता बालकाच्या क्षमतेनुसार बालकाचा विकास करावा.. नितीन जगताप (जीनियस कीड नाशिक)
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरातील जानकी नगर परिसरात नुकताच जीनियस कीड या मेंटल मॅथ अकॅडमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून नवापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शिरीषभाई शहा , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश काळे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष हेमलताताई पाटील, प्राचार्य मिलिंद वाघ, माजी प्राचार्य प्रा गोपाल पवार, मुख्याध्यापक महेश पाटील, तसेच जुनियस कीड चे महाराष्ट्राचे प्रमुख नितीन जगताप, नंदुरबारचे प्रमुख गायत्री महाजन यांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. सर्व मान्यवरांचे स्वागत सोमनाथ महाजन, राजेंद्र माळी सौ नीलिमा माळी, प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
बालकांच्या ब्रेन डेव्हलपमेंट साठी कुठल्याही प्रकारचा अट्टाहास न करता बालकांच्या सवडीने आणि आवडीने, खेळ स्वरूपाने अभ्यास दिल्यास बालकांचा ब्रेन डेव्हलप होतो असा दावा जीनियस कीड नाशिकचे संचालक नितीन जगताप यांनी केला. नवापूर शहरात अभिनव उपक्रम करणाऱ्या माळी दांपत्याचे मनःपूर्वक कौतुक करून या उपक्रमाला शिरीषभाई शहा यांनी शुभेच्छा दिल्या. लहान बालकांसाठी नवापूर शहरात आलेल्या पर्वणीचा सर्व बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष हेमलता ताई पाटील यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ जगदीश काळे यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बालकांना विकसित करण्याचे नवापूर शहरात जीनियस कीड हे उत्तम माध्यम असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार प्रास्ताविक नवापूर जीनियस कीड मेंटल मॅथ अकॅडमीचे प्रमुख प्रा डॉ नितीनकुमार माळी तर आभार राजेंद्र माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद गावित,धनंजय खेडकर,संदीप कुवर, राजधर जाधव,कैलास माळी, निलेश देवरे, डॉ.गणेश महाजन, तसेच नवापूर शहरातील सर्व पालकांनी प्रयत्न केले.