माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, उद्या १८ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार.....

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, उद्या १८ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार.....
           नवापूर सत्यप्रकाश 
    भारत देशाचे माजी केंद्रीय गृह राज्य व सामाजिक न्याय विभागाचे मंत्री व माजी जि.प.अध्यक्ष  भरतभाऊ गावीत व इगतपुरीच्या माजी आमदार.सौ निर्मलाताई  गावित  यांचे पिताश्री दादासाहेब माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 88 वर्षी आज दि.17/9/2022 शनिवारी रोजी निधन झाले.
       त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.18/9/2022 रविवार रोजी  निवासस्थान येथून निघून  धनराट रोडवरील असलेल्या फार्महाऊसवर सकाळि 11-00 वा.अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
      9 वेळा खासदार व दोन वेळा केंद्रीय मंत्रिमंडळात सहभाग व लोकसभेचा हंगामी सभापती सारखे सर्वोच्च पदावर असलेल्या दादासाहेब माणिकराव गावित यांची निधनाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर सावरला असून अनेक मान्यवरांनी निवासस्थानी जाऊन भेट दिली .
   जीवन कार्याचा परिचय 
श्री माणिकराव होडल्या गावीत, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री,
खासदार, नंदुरबार (लोकसभा मतदार संघ) १५ नंदुरबार अ.ज.पुर्ण नावश्री माणिकराव होडल्या गावीत वडीलांचे नांव,कै. होडल्या बोंडा गावीत,आईचे नांव,कै. जमुनाबाई होडल्या गावीत,जन्मतारीख,,२९ ऑक्टोबर १९३४,धुळीपाडा पो. धनराट ता. नवापूर जि. नंदुरबार (महाराष्ट्र)जन्मस्थळ
पत्नीचे नांव,सौ. सुरेखाबाई माणिकराव गावीतमुले,१ मुलगा / ४ मुली
शैक्षणिक पात्रता -जुनी मॅट्रीक १०वीव्यवसाय शेती
सामाजिक/राजकीय कार्य
१९६५-७१ सदस्य, नवापूर ग्रामपंचायत, नवापूर जि. धुळे (महाराष्ट्र)सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परीषद, धुळे. (महाराष्ट्र)
१९७१-७८,१९७८-८४उपाध्यक्ष, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी (आय)
१९८०-८१,विधानसभा सदस्य, नवापूर मतदार संघ (महाराष्ट्र),लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ ७ वी लोकसभा (पहिला टर्म),अध्यक्ष, समाज कल्याण समिती
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मयाँ नाशिक
लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ ८ वी लोकसभा (दुसरा टर्म)
लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ ९ वी लोकसभा (तिसरा टर्म)
१९८१-८४१,१९९०-९१
सदस्य, लोकसभेत / राज्यसभेत गैरहजर राहणाऱ्या लोकसभा सदस्य/ राज्यसभा सदस्य केंद्रीय समिती.
१९९०-९६,सदस्य, भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस केंद्रीय समिती
लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ १० वी लोकसभा (चौथा टर्म)
१९९१,१९९१-९३,सदस्य, भारतीय रेलवे केंद्रीय समिती (दुसरा टर्म)
१९९६,लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ ११ वी लोकसभा (पाचवा टर्म)
लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ १२ वी लोकसभा (सहावा टर्म)
सदस्य, मजदुर व समाज कल्याण केंद्रीय समिती
सदस्य, भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस केंद्रीय समिती.
लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ १३ वी लोकसभा (सातवा टर्म)
१९९९-२०००,सदस्य, लोकसभेत/राज्यसभेत गैरहजर राहणाऱ्या लोकसभा सदस्य,राज्यसभा सदस्य केंद्रीय समिती. सदस्य, भारतीय रेलवे केंद्रीय समिती.
२०००,सदस्य, केंद्रीय अनुसूचित जाती/जनजाती सल्लागार समिती सदस्य, भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस केंद्रीय समिती.
१३ में २००४,लोकसभा सदस्य, नंदुरबार मतदार संघ १४ वी लोकसभा ( आठवा टर्म)
२२ मे २००४ते राज्यमंत्री, गृहमंत्रालय, भारत सरकार क्षेत्रिय प्रभारी, गुजरात विधानसभा निवडणुक (दक्षिण गुजरात). लोकसभा सदस्य, नंदुरबार १५ अ.ज.
सदस्य, केंद्रीय न्यायिक समिती (पिटीशीयन)
सदस्य, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, मुंबई.
सदस्य, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नई दिल्ली.
दक्षिण आफ्रिका, भारतीय लोकसभा सदस्यांची समिती दौरा.
विदेश दौरा
सामाजिक, शैक्षणिक कार्य
अध्यक्ष, समाज कल्याण समिती, धुळे जिल्हा महाराष्ट्र
अध्यक्ष, विसरवाडी एज्युकेशन सोसायटी, विसरवाडी ता. नवापूर (१९७४ ते २००४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, नाशिक. (१९८०-८४)
अध्यक्ष, आदिवासी सेवा सहाय्यक व शैक्षणिक संस्था, नवापूर.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर
सु.हि. नाईक अध्यापक विद्यालय, नवापूर,
अध्यापक पदविका विद्यालय, नवापूर.
सिनेट सदस्य, पुणे विद्यापिठ (१९७४-७५)
सदस्य, तेलबिया विकास बोर्ड (१९९८-९९)
(सन १९७८ मध्ये जनता दलाचे सरकार असतांना जेल भरो आंदोलनात सहभाग)
 नवापुर शहराचे भूमिपुत्र माजी केंद्रीयमंत्री व माजी खासदार 
श्री दादासाहेब माणिकरावजी गावित* यांचे दुःखद  निधन झाले आहे ,संपूर्ण शहर शोकमग्न आहे व उद्या दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे 11 वाजेला अंत्यसंस्कार असल्याने  नवापूर व्यापारी बंधु कडून श्रद्धांजली म्हणून उद्या सर्व दुकाने व बाजार बंद ठेवण्याचे आवाहन मर्चंट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे .
-----------------------------------
     मान्यवरांची श्रध्दांजली
स्व.दादासाहेब माणिकराव गावित हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेता होते 9 वेळा खासदार 2 वेळा केंद्रीय मंत्री भूषवून आदिवासी समाजाचे नेतृत्व करून लोकसभेचा सभापती पदाचा बहुमान मिळविणारे प्रथम व्यक्तिमत्व होते.त्यांचे कार्य बहुमोल असून त्यांच्या जाण्याचे अतिशय दुःख आहे.
        त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
           मा.आ.शिरिषकुमार नाईक 
                     आमदार नवापूर 
----------------------------------
 स्व माणिकराव गावित यांचे माझे गेल्या 55 वर्षांपासून मैत्रीचे संबंध होतो 1967 पासून मी आणि त्यांनी सोबत राजकारणात सहभाग नोंदवून ग्रामपंचायत निवडणूक लढविली ,
     ते माझे अतिशय चांगले मित्र होते त्यांचा सोबत माझे पारिवारिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संबंध होते.
      मी स्वतः आजारी असल्याने मुंबई येथील रुग्णालयात आहे.त्यांचा अंत्यसंस्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा असून सुध्दा उपस्थित राहू शकत नाहि याचे दुःख आहे.
    त्यांच्या निधनाने मला फारच दू:ख झाले असून त्यांच्या परिवारावर आलेल्या दु:खात मी सहभागी असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
      मा. विपीनभाई चोखावाला.
माजी नगराध्यक्ष व उद्योजक, नवापूर 
--------------------------------------
     माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा खासदार म्हणून विजयी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादासाहेब माणिकरावजी गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
   संसदेच्या इतिहासात एवढा प्रदिर्घ काळ सदस्य राहिलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. अतिशय मृदू स्वभावाचे तसेच, लोकाभिमुख नेतृत्त्व असणाऱ्या दादासाहेब यांच्या निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचा प्रदिर्घ अनुभव असणारे
   एक जाणते नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. स्वर्गिय. माणिकराव दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 
             मा.सौ.हेमलताताई अजय पाटील 
  नगराध्यक्षा न.पा.नवापूर 
--------------------------------------

1 Comments

  1. स्वर्गीय दादासाहेब यांचे कार्य महान आहे, दादासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
Previous Post Next Post