आदिवासींचा सच्चा सेवक दादासाहेब माणिकरावजी गावित अनंतात विलीन
नवापूर - सत्यप्रकाश न्युज
आदिवासींचा सच्चा सेवक दादासाहेब माणिकरावजी गावित यांचे अल्पशा आजाराने दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ०८:०५ मि. देवाज्ञा झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ११:०० वा.राहत्या घरून सुमाणिक चौक नवापुर येथून ते नवीन महादेव मंदिर गल्ली, गुजरगल्ली, शिवाजी रोड, कुंभारवाडा, शितल सोसायटी, महात्मा गांधी पुतळा, लिमडावाडी, लाईट बाजार चौक , मेन रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, स्वामी विवेकानंद चौक, आंबेडकर चौक, देवळफळी मार्गे सुमाणिक फार्म हाऊस ( वाडी ) येथे मुखाग्नी पुत्र भरत गावित यांनी देऊन अंत्यसंस्कार विधी हजारो चाहत्यांचा उपस्थित शासकीय इतमामात हवेत पोलीस दलामार्फत गोळ्या झाडून पार पाडण्यात आला.
देशाचे 9 वेळा खासदार, 2 वेळा केंद्रीय मंत्री व देशाचे लोकसभेचा सभापती पर्यंतचा पद भूषवणारे नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील नेतृत्व दादासाहेब माणिकराव गावित यांचे वयाचा 88 व्या वर्षी नाशिक येथील सुयश हाॅस्पिटला मध्ये निधन झाल्यानंतर काल त्यांचे पार्थिव नाशिक,मालेगांव, धुळे,साक्री मार्गे नवापूर येथे आणण्यात आले रस्त्यावर त्यांचा अनेक चाहत्यांनी ठिकठिकाणी पुष्प वाहून श्रध्दांजली अर्पण केली तर रायंगण गावात पांघराण आश्रमशाळेतील विद्यर्थीनी
तर आज शहरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली असता ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या तर पुष्पवृष्टी वाहण्यात आली यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
काल त्यांचा निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , डाॅ.भारती पवार ज्येष्ठ नेते शरद पवार, खा.डाॅ.हिना गावित, सुप्रिया सुळे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील नवापूरचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक विपिनभाई चोखावाला यांनी श्रध्दाजली
तर आज त्याच्या यात्रेत मुलगी इगतपुरीच्या माजी आमदार सौ.निर्मलाताई गावित, अभि.रमेश गावीत प्रा.डॉ.जयश्री गावित, नीता गावित, पुत्रवधु संगिता गावीत नाते धनंजय व मानस गावित पुतणे माजीनगराध्यक्ष गिरिश गावित,विजय गावित, अजय गावीत, यांच्यासह राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक ,के सी.पाडवी,मंत्री डाॅ. विजयकुमार गावित, माजी मंत्री जयकुमार रावल ,आ.शिरिषकुमार नाईक, आ.डाॅ. सुधीर तांबे ,आ.पद्माकर वळवी, आ.मंजुळा गावित जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, गुजरातचे माजी मंत्री कांतीभाई गावीत ,
नगराध्यक्षा सौ.हेमलताताई पाटील माजी आमदार शिरिष चौधरी,विजय चौधरी ,पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, तहसिलदार मंदार कुलकर्णी नगराध्यक्ष ,डाॅ.सुहास नटावदकर, प्राचार्या डाॅ.सुहासिनी नटावदकर आजतकच्या प्रतिनिधी नूपूर मावची,अभिनेत्री शिवानी चक्रवर्ती,प्रा.निशा मावची माजीनगरसेविका मीराबेन चोखावाला ,कुवरसिंग दादा वळवी,दीपक नाईक ,पंचायत समित अभियंता एस.सी.चव्हाण, अभि.सुनील साळुंखे,अभि.संदिप पाडवी, विस्तार अधिकारी आर.आर. देसले, भानुदास रामोळे , पराग ठक्कर, अजय पाटील, आर.आर. अग्रवाल, विजय लोहार ,अमोल कांबळे, रमेशचंद्र राणा,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ पोलीस निरीक्षक अशोक मोकल, आदिसह शहरातील व परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी ,प्रतिष्ठित नागरिक, व शहरातील महिला व पुरुष वर्ग मोठ्य प्रमाणात उपस्थित होते.
Tags:
सामाजिक