शिवसेना शिंदे गट नवापूर तालुका प्रमुखपदी बकाराम गावितनवापूर शहर प्रमुखपदी भालचंद्र गावित यांची नियुक्ती.....

शिवसेना शिंदे गट नवापूर तालुका प्रमुखपदी बकाराम गावित
नवापूर शहर प्रमुखपदी भालचंद्र गावित यांची नियुक्ती
    नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    नंदुरबार जिल्ह्याचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुंबई येथे मोठ्या संख्येने कार्यकत्यांसह जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नवापूर शहर व तालुक्यात शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे शिंदे गट नवापूर तालुक्यात मजबूत होऊन शिवसेना व इतर पक्षांना धक्का देणार असल्याचे चित्र आहे. चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार जिल्ह्यात कमालीचे सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले असून जिल्ह्यात

ॐ भालचंद्र गावित यांनी नवापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणीची निवड करून विविध प्रभागात शाखा सुरु करुन पक्ष संघटन मजबूत केले जाईल, लोकांची कामे या माध्यमातून केली जातील. यापूर्वीचे शिवसैनिक जे शिवसेनेपासून दूर गेले आहेत ते संपकांत आहेत. त्यांना जवळ घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने काम करन सक्रीय केले जाईल. शिंदे गटाचे काम येत्या काळात पहायला मिळेल. चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाने काम करु, असेही त्यांनी सांगितले. भालचंद्र गावित यांनी यापूर्वी काँग्रेसचे काम केले आहे. ते नवापूर नगरपालिकेत काँग्रेसचे

तालुका व गावनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी नवापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखपदी विसरवाडीचे चकाराम फतेसिंग गावित तर नवापूर शहर प्रमुखपदी नवापूरचे माजी नगरसेवक भालचंद्र गावित यांची नियुक्ती केली आहे. बकाराम गावित यांनी नवापूर येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नाने नियुक्ती झाल्याचे सांगितले. त्यांच्या आदेशाने तालुक्यात सक्रीय काम करु. नवापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच त्याचा विस्तार करण्यात येईल.

नगरसेवक होते. अनेक कामे त्यांनी आपल्या प्रभागात केली आहेत. राजकारणापासून दूर गेलेले भालचंद्र गावित पुन्हा शिंदे गटाच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. बकाराम गावित हे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत विसरवाडी येथे शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांची शिवसेना शिंदे गटाचे नवापूर तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. विसरवाडी व इतर गाव पाड्यावर बकाराम गावित यांची जबरदस्त पकड़ आहे. बकाराम गावित यांना मानणारा मोठा गट नवापूर तालुक्यातील गावपाड्यांवर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post