विद्यार्थीप्रिय सेवानिवृत्त शिक्षक भटूभाउ जाधव यांचा दैनिक पत्रकार संस्थेतर्फे सन्मान.....

विद्यार्थीप्रिय सेवानिवृत्त शिक्षक भटूभाउ जाधव यांचा दैनिक पत्रकार संस्थेतर्फे सन्मान.....  
           नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
     येथील मार्च शिक्षण संस्था संचालित वनिता विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व स्वामी नारायण भगवानचे निस्सीम भक्त, उत्कृष्ट सूत्रसंचालन,शहरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विषयाचे सखोल ज्ञान असलेले बापूसो भटुभाउ परशराम जाधव हे आपल्या शासकीय सेवेचा नियमानुसार वयाचा 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले.
     नवापूर शहरात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सह महाविद्यालयीन आणि शिक्षणशास्त्र विषयाची पदवी संपादन करून इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेल्या शिक्षकाचे मार्च संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.गोविंदराव वसावे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व.एस.आर.पाटील सरांनी भटूभाउ जाधव यांना इंग्रजी विषयाच्या अध्यापन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्याच संधीचा फायदा घेऊन बापूनी आपल्या विदयार्थाना इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान दिले व आज त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून कित्येक विदयार्थीनीनी वैद्यकीय, अभियांत्रिकी ,अभिनय क्षेत्रात उंच भरारी घेऊन आपले व परिवाराचे स्थान उंचावत आहे.
    शाळेच्या स्थापने पासून तर सेवानिवृत्ती पर्यत केवळ एकच ध्यास मनाशी ठेवत तो म्हणजे माझ्या शैक्षणिक ज्ञान दानामुळे माझ्या शाळे सह विदयार्थीनीचे नांव कसे उंचावेल या प्रयत्नात असलेले व विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन करून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध करून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह, शिक्षक, व शहरातील नागरिकांचा लोकप्रिय असलेल्या विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल  दैनिक पत्रकार संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात 
      यावेळेस पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले सचिव महेंद्र जाधव, कोषाध्यक्ष प्रेमेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर निकम, विनायक सूर्यवंशी, हेमंत पाटील, हेमंत जाधव आदींची उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post