विज्ञान प्रदर्शनात कु.तनुश्री जगदीश जयस्वाल चे उपकरणाला द्वितीय क्रमांक.......

 विज्ञान प्रदर्शनात कु.तनुश्री जगदीश जयस्वाल चे उपकरणाला द्वितीय क्रमांक.......
         नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
      नवापूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  स्व.महादु गावित अनुदानित आश्रमशाळा दापूर ता.नवापूर येथे संपन्न झालेल्या शैक्षणिक वर्ष 2021-2022 चे
 43वे  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रीमंती प्र. अ. सोढा सार्वजानिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम्. व्होरा ज्युनियर कॉलेज नवापूर येथील  माध्यमिक गटातून इ.11वी विज्ञान वर्गातील तनुश्री जगदीश जयस्वाल  सेव वॉटर टॅप या उपकरणाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
     कु.तनुश्री हि येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश जयस्वाल यांची कन्या असून तीला आदिवासी ज्ञानपीठाचे सचिव विजय गावित यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
     कु.तनुश्रीला मिळालेल्या  यशाबद्दल संस्थाध्यक्ष विपीनभाई चोखावाला, कार्याध्यक्ष शितलबेन वाणी,उपाध्यक्ष शिरिषभाई शहा,सचिव जितूभाई देसाई, कोषाध्यक्ष सतिषभाई शाह, सहसचिव सोएबभाई मांदा,मुख्याध्यापक मिलिंद वाघ उपमुख्याध्यापक नारायण मराठे,पर्यवेक्षक प्रा ए.बी. थोरात ,दिपक मंडलीक, आदिसह सत्यप्रकाश न्यूज तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. 


                     

Post a Comment

Previous Post Next Post