खाबदा येथे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्नेह मेळावा संपन्न........

खाबदा येथे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्नेह मेळावा संपन्न..
नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   नवापूर येथे परिचित असलेला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खाबदा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे नुकतेच सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक संघाच्या आयोजनात 106 ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनी चाचणी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोरभाई दलाल सचिव सुरेशभाई पाटील, ज्येष्ठ नागरिक शिरीष भाई शहा कोषाध्यक्ष महेंद्र भाई मेहता माजी अध्यक्ष नगीनदास अग्रवाल, माझी प्राचार्य गोपाळराव पवार, डी एस अप्पा पाटील, सेवानिवृत्त इंजिनियर अरुणकुमार गावित, मानसशास्त्रीय समुपदेशक व मार्गदर्शक डॉक्टर नितीनकुमार माळी, रोहानी सत्संग केंद्राचे संचालक परमजीतसिंग जी महाराज,सेवानिवृत्त हेपलाईनचे समन्वयक राहुल पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. प्रथम सत्रात आप्पासो डी एस पाटील यांनी योगासन व प्राणायाम करून वृद्धांचे तरुण मन करण्यासाठी आनंदाने जगता येईल.तसेच अवयव सक्षम असतील तर आपण सुखी समाधानी जीवन जगू असा संदेश याप्रसंगी दिला. गोपालराव पवार यांनी समाजाची व्यथा मांडताना विनोदी पद्धतीने समाजात सकारात्मक विचार ठेवून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता जीवन आरोग्य संपन्न आणि आनंदी जगता येईल असे प्रतिपादन केले. द्वितीय सत्रात भोजनानंतर मानसशास्त्रीय समुपदेशक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी अपेक्षांचे ओझे न बाळगता कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवून काम केले, तर आनंदी जीवन जगण्याचा सुखर मार्ग सापडेल आणि सुख शांती समाधान नक्की मिळेल असे प्रतिपादन केले. सर्व कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनाचा संपूर्ण खर्च ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर भाई दलाल यांनी त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भाई पाटील तर आभार श्रीकांत पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post