महिला लोकशाही दिनाचे 17 ऑक्टोंबर रोजी आयोजन.......

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑक्टोंबर रोजी आयोजन
नंदुरबार, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 17 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
   महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 10.30 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित  राहून सादर करावे. असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post