विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी,20 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन......

विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी,20 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन......
नंदुरबार, दि.13 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या उर्वरित कालावधीसाठी विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवार 20 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासभेकरीता उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर हे पिठासन अधिकारी असतील. तरी जिल्हा परिषदेमधील सदस्य व पंचायत समितीतील सभापती यांनी विशेष सभेस उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी  नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post