जिल्ह्यातील 2 लाख 63 हजार 821
नंदुरबार, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर, आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नस संच (दिवाळी किट ) रुपये शंभर मात्र या दराने शासनाकडून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील 2 लाख 63 हजार 821 अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
या शिधाजिन्नस संचाचे तालुकानिहाय वितरण पुढील प्रमाणे आहे. नंदुरबार 58 हजार 747, नवापूर 47 हजार 443, शहादा 64 हजार 47, तळोदा 27 हजार 305,अक्कलकुवा 40 हजार 866, अक्राणी 25 हजार 413 असे आहे.
सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून दिवाळीपूर्वी जाऊन ई-पास मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे. तसेच रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) घेतल्याची पावती घेवून संचात 4 पाकीट असल्याची खात्री करावी. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
Tags:
कृषी