नवापूर 81 ग्रामपंचायतीची रणधुमाळीला सुरूवात..........

नवापूर 81 ग्रामपंचायतीची रणधुमाळीला सुरूवात..........
        पांघराण कोकणीफळि 
नवापूर  सत्यप्रकाश न्यूज 
   येथील 81 ग्रामपंचायतीची रणधुमाळी आज सकाळपासून सुरू झाली असून काल तहसिलदार मंदार कुलकर्णि,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहकारी कर्मचारी व एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर ३७ एसटी बस तसेच निवडणूक विभागाने भाडे बंदोबस्तात रवाना झाले. 
      घोडजामणे - मतदान केंद्र - 2
    आज सकाळपासून मतदार आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्या साठि मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतांना दिसले घोडजामणे येथील मतदान केंद्र क्र.2 व 3 वर हजेरी लावत सकाळि 7:30 वा.मतदानाचा हक्क बजावला व आपल्या कामावर निघाले.
      घोडजामणे मतदान केंद्र नं 3
झोनल अधिकाऱ्यांनी देखील आपपल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच भेट देऊन केंद्रावरील अध्यक्ष व कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला.
            शिर्वे मतदान केंद्र
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी साठी पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी 
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवानांसह असे २०० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. ७८ ग्रामपंचायतीची निवडणूकीसाठी मतदान होणार आहे, सरपंच पदाच्या निवडणुकीत ३२२ उमेदवार रिंगणात आहेत तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १७१३ उमेदवार नशिब आजमावणार आहेत. यांच्यासाठी तारपाडा-पिंप्रीपाडा. ५९ हजार २६४ पुरुष तर ६४ हजार ४४ महिला असे एक लाख २२ हजार २०८ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. 
    करंजी बुद्रुक भोमदिपाडा केंद्र 
आज खालील ग्रामपंचायत निवडणुकींचे सकाळपासून घमासान सुरू झाले आहे.
 मोठे कडवान, लहान कडवान, खानापूर, चि तवी, नगारे, निजामपूर, बिलमांजरे, भवरे, मेहदीपाड तत्वावर मागवलेल्या १५ खाजगी वाहनाद्वारे पोलीस, वागदी, आमलाण, खातगाव, नागझरी, सोनपाडा, हळदाणी, घोडजामणे, चिखली, चौकी, नावली, बंधारफळी, बिजगाव, शिर्वे, कोकणीपाडा, झामट्यावड देवमोगरा, भादवड, रायपुर, वड, वडदे, करंजाळी तारापूर, भरड़, 
लक्कडकोट, सावरट, चोरविहीर, बोकळझर-वडफळी, बोरपाडा, करंजी बुद्रुक, कामोद, दापूर, देवलीपाडा, निमदर्डा, मळवान, मीलीपाडा,वडसत्रा, अंजने, करंजी, केलपाडा, झामणझर, तलाविपाडा, नवागाव, बिलदा, उथर्डी, कोळदा, खांडबारा, देवलीपाडा, पांघराण, बंधारे, मोगरानी, आमपाडा, कारेघाट, खैरखे, जामदा, बालअमराई, वासदा, सोनारेदिगर, चिंचपाडा, डोगेगाव, थुवा, दुभवे, नवापाडा, बोरचक, खोकसा, गडद,        देवळिपाडा चितवी केंद्र 
    तालुका नवापुर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 एकूण ग्रामपंचायत- ८१ 
एकूण मतदार -126737
 (स्त्री- 65374  व पुरुष 61363) .
    सकाळि 11:00 वाजेपर्यंत 15 ते 20 % मतदान झाल्याचे कळले आहे.
     उद्या कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात मतमोजणीस सुरूवात 15 टेबलावर 6 फेरया होणार असून उमेदवारांन व प्रतिनिधिंना महाविद्यालयाचा प्रवेश द्वारातून प्रवेश दिला जाईल येतांना सोबत आधार कार्ड ठेवावे अशी माहिती मतदान अधिकारी व तहसिलदार मंदार कुलकर्णि यांनी दिली.            कोळदा मतदान केंद्र 

Post a Comment

Previous Post Next Post