सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा नवापूर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा......

सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा नवापूर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा......
      नवापूर सत्यप्रकाश न्यूज ......
नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा, डुबास बिल्डिंग, स्वामी विवेकानंद चौक नवापूर येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री शिरीषभाई शाह होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. नेमीचंदजी अग्रवाल, ॲडव्होकेट नितीनभाई देसाई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 
सर्वप्रथम इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी  एक वाचन प्रेरणा समूहगीत कृतीयुक्त सादर करून मान्यवरांची दाद मिळवली.
थोर शास्त्रज्ञ मिसाईलमॅन माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला त्यामध्ये स्वीटी लक्ष्मण बंडगर, रोहन संजय बेहेरे, भाग्यश्री नारायण कुशवाह, यशस्वी मनोज भोई, विवेक विनोद राठोड, उजमा निसार बेलदार हे सहभागी होते.  मानवाच्या वैयक्तिक व सामाजिक विकासासाठी आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी शब्द शब्द वाचूया आनंदाने वाचूया... इयत्ता चौथीचे विद्यार्थी वीर महेश पाटील, हर्षीका सुनिल दुसाणे, सार्थक नितीन पाटील यांनी गोष्ट वाचन केली.
अध्यक्षीय मनोगतात श्री शिरीषभाई शहा यांनी सांगितले की, वाचाल तर वाचाल ज्ञान मिळवाल तर यशस्वी व्हाल ज्ञान व वाचन यांचे खूप जवळचे नाते आहे, या स्पर्धात्मक जीवनात ज्ञान मिळवून यशस्वी व्हायचे असेल तर भरपूर वाचनाची गरज आहे. आपल्याकडे ज्ञानाचा खजिना असेल तर यश आपल्याकडे असते वाचनाची  होईल मैत्री यशाची मिळेल खात्री.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती योगिता पाटील यांनी तर प्रास्ताविक श्रीमती माधुरी चित्ते तर आभार श्रीमती मनीषा भदाणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post