एन. मुक्ता प्राध्यापक संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न..
कुठल्याही पक्षाचा जातीचा पंथाचा विचार न करता प्रामाणिक आणि समर्पित सेवेला संघटनेने दिले प्राधान्य.. कसा सुर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला..
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे नुकतीच राष्ट्रीय शैक्षिक महासंघ विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटना आणि मुक्ता यांची जिल्हा कार्यकारणी सहविचार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ नितीन बारी, नवापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल, नंदुरबार जिल्ह्याचे डॉ सुनील कुवर, स्थानिक अध्यक्ष डॉ. सुनील बोरसे, सचिव डॉ.भगवान चौधरी, माजी अध्यक्ष डॉ संतोष पाटील, कोषाध्यक्ष डॉ.एस एस पाटील, डॉ संजीव कोळी डॉ.सी एस सुतार, तसेच नवापूर शाखेचे अध्यक्ष डॉ सुनील कुवर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी संघटन गीत गाऊन केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथील पदाधिकाऱ्यांनी तसेच या मुक्ता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल यांना आदर्श प्राचार्य पुरस्काराबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भगवान चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ नामदेव गजरे तर आभार प्रा एकनाथ गेडाम यांनी मानले. विद्यापीठातील निवडणुकीत फक्त एकच सदस्य निवडून आल्यानंतर आपण विद्यापीठातील पाकीट पद्धती बंद केल्याचा अभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.आजपर्यंतच्या इतिहासात तीस वर्षे सेवा झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही कमिटीत न जाणाऱ्या माणसाला आपण योग्य त्या न्याय मिळवून दिला. कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेनुसार विविध समितीची स्थापना करून,प्रामाणिक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण पक्ष आणि जातीपातीच्या पलीकडे केला असल्याचे सुतोवाच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल यांनी अत्यंत प्रमाणिकपणे काम करणारी संघटना असल्याचे निदर्शनास आणून दिले. हे संघटन फक्त निवडणुकीपुरते नसावे तर ते दीर्घकालीन टिकणारे असावे असा आशावाद याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
अध्यक्ष भाषणात डॉ नितीन बारी यांनी आत्तापर्यंत प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दिलेला लढा आणि त्यातून निष्पन्न झालेलं आऊटपुट संदर्भासहित स्पष्ट केले.कुठल्याही प्राध्यापकावर अन्याय होणार नाही याची काळजी गेल्या पाच वर्षात घेतली आहे आणि यापुढेही घेईन असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांना दिला. आपली संघटना ही संघटनच्या जोरावर उभी आहे म्हणून आपल्या सर्वांचे सहकार्य असेलच असा आशावाद व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दीपक जयस्वाल, डॉ श्रीकांत महाजन डॉ जगदीश काळे, डॉ एस डी पाटील, ग्रंथपाल राहुल तुपे, डॉ. सुभाष पुलावडे, डॉ विनायक वसईकर, प्रा अण्णा मुळे यांनी प्रयत्न केले.
Tags:
शैक्षणिक