नवापूर सत्यप्रकाश न्युज
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुलवाडकर यांना हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, नवापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गावातील काही लोक अनधिकृत अतिक्रमण करून दुकाने लावत आहेत. त्यामुळे पुतळ्याजवळ गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क बऱ्याचवेळा ग्राहक व दुकानदारांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे प्रकार आला आहे. घडतात. त्यातून याठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे. याभागात सातत्याने अस्वच्छता निर्माण होऊन पुतळा परिसराची विटंबना होत आहे. यामुळे बौद्ध समाजबांधवासह शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत अतिक्रमण न काढल्यास समाजबांधवांकडून आंदोलन
छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात
निवेदनावर माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, जितेंद्र अहिरे, सुनील वाघ, विजय तिजविज, छोटु अहिरे, राहुल सिरसाठ, विजय पवार, योगेश साळवे, रंजीत शमशेर, अजय राठोड, प्रवीण तिरमली, ललित बिऱ्हाडे, विनोद झाझरे, संतोष तिरमली, दीपक तिरमली, लक्ष्मण चव्हाण, रोहन पवार, रवी अहिरे, शुभम साळवे, रवी तिरमली, पंकज परदेशी, महेश पेंढारकर यांच्या सह्या आहेत.
Tags:
सामाजिक