एनएनके कॅपिटल कोपरगाव आयोजित आर्थिक साक्षरता गुंतवणूक चर्चासत्रात उपस्थित राहण्याचे नितीन डोंगरे व सौ.निता डोंगरे यांचे आवाहन........

एनएनके कॅपिटल कोपरगाव आयोजित आर्थिक साक्षरता गुंतवणूक चर्चासत्रात उपस्थित राहण्याचे नितीन डोंगरे व सौ.निता डोंगरे यांचे आवाहन........
     कोपरगाव सत्यप्रकाश न्युज 
येथील, गुंतवणूक व आर्थिक नियोजन सल्ला क्षेत्रात कार्यरत असलेल्या,
एनएनके कॅपिटल यांचेमार्फत, दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी, दुपारी १२ वा. कोपरगाव येथील हॉटेल वीरा पॅलेस (खंदक नाला) येथे "आर्थिक साक्षरता व गुंतवणूक" या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या संस्थेच्या संचालिका सौ नीता डोंगरे, संचालक श्री किशोर मुरडे यांनी दिली.
   या चर्चासत्रामध्ये, आपल्या उत्पन्नानुसार, पैशाचे सुयोग्य नियोजन कसे करावे? 
आपल्या आयुष्यातील ध्येय, उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपली गुंतवणूक कशी असावी, तसेच विविध गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा आणि संपत्ती याचा समतोल कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक,व आर्थिक नियोजन क्षेत्रातले तज्ञ व्याख्याते देखील येत आहेत..
या चर्चासत्राचे माध्यमातून आपल्या मनातील प्रश्न , शंकांचे निरसन होऊ शकेल..त्या साठी या चर्चासत्राचा आपण सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कर सल्लागार श्री नितिन डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post