नंदुरबार जिल्ह्य परिषदेच्या नुतन अध्यक्ष पदि डाॅ.सुप्रिया गावीत तर उपाध्यक्ष पदि सुहास नाईक यांची निवड..........

नंदुरबार जिल्ह्य परिषदेच्या नुतन अध्यक्ष पदि डाॅ.सुप्रिया गावीत तर उपाध्यक्ष पदि सुहास नाईक यांची निवड......

           नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज                          जिल्हा परिषदेच्या नुतन अध्यक्षा म्हणून भाजपाच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित या विजयी  झाल्या तर  उपाध्यक्ष पदि कॉंग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.     याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दि.१७ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

   अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून मावळत्या अध्यक्षा ऍड.सीमा पद्माकर वळवी, गीताबाई चांद्या पाडवी यांनी नामांकन दाखल केले होते. भाजपाकडून डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित, डॉ.कुमुदिन विजयकुमार गावित, राजश्री शरद गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

   तर उपाध्यक्षपदासाठी भाजपापुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुहास वेच्या नाईक व बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून ऍड.राम चंद्रकांत रघुवंशी व रुपसिंग विजय पराडके यांनी नामांकन दाखल केले होते. माघारीच्या मुदतीत गीताबाई पाडवी, डॉ.कुमुदिनी गावित, राजश्री गावित तसेच विजय पराडके यांनी माघार घेतली.                त्यामुळे अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या ऍड.सीमा वळवी व भाजपाच्या डॉ.सुप्रिया गावित तसेच उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे ऍड.राम रघुवंशी व भाजपा पुरस्कृत कॉंग्रेसचे सुहास नाईक यांच्यात लढत झाली.                                                     यात डॉ.सुप्रिया गावित यांना ३१ तर ऍड.सीमा वळवी यांना २५ मते मिळाली. त्यामुळे डॉ.सुप्रिया गावित यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदासाठी सुहास नाईक यांना ३१ तर ऍड.राम रघुवंशी यांना २५ मते मिळाली.     त्यामुळे सुहास नाईक यांना विजयी घोषीत करण्यात आले. निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची आतीषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी खा.डॉ.हीना गावित, आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.आमशा पाडवी, माजी आ.शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजीमंत्री पद्माकर वळवी, माजी आ.शरद गावित, सातपुडा कारखाना चेअरमन दीपक पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत कॉंग्रेसचे २४, भाजपाचे २० राष्ट्रवादीचे चार, बाळासाहेबांची शिवसेनेचे सहा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन असे पक्षीय बलाबल होते. मात्र राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी यापूर्वीच भाजपाला समर्थन दिले होते.तर शहादा येथील अन्य एका सदस्यानेही समर्थन दिले. संख्याबळ कॉंग्रेसकडे जास्त असतांनाही कॉंग्रेसचे पाच सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दोन सदस्यांनी भाजपाला मतदान केल्याने सत्तेत हा बदल झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post