बोगस नोंदणीचे फॉर्म जमा करायला गेलेल्या शिक्षकावर गुन्हा दाखल......
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नोंदणी सुरू झालेली असून, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशा प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नोंदणी करून घेण्यासाठी विभागातील. एका शिक्षकाने बोगस मतदार नोंदणी करण्याच्या उद्देशाने 140 प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फॉर्म जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गेला असता
नोंदणी अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी सदर शिक्षकाची चौकशी केली, एका इच्छुक उमेदवाराने सदरची बोगस नोंदणी मला सांगितले आहे असे त्यांनी कबूल केले
बोगस नोंदणी फॉर्मवर ज्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आहे त्यावर व संबंधित फॉर्म भरणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला असून निलंबनाची कारवाई केली जाणार आहे
असे वृत्तांकडून समजले
मागील निवडणुकीत कोकण विभाग शिक्षक मतदार संघात अशाच प्रकारची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे अनेक संघटनांनी केलेली आहे.
मुख्य निवडणूक आयोग यांची करडी नजर कोकण, औरंगाबाद ,नागपूर या सर्व शिक्षक मतदार संघावर आहे.
अशा बोगस शिक्षक मतदार नोंदणीला आळा बसवण्यासाठी शिक्षक पोर्टल व यु-डायस ची माहिती पडताळणी करण्याचे काम निवडणूक आयोगाने सुरू केले आहे. तसेच जर यात कोणी दोषी सापडल्यास त्यांना कोणत्या प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही ,अशी चेतावणी निवडणूक आयोगाने दिली आहे
Tags:
राजकीय