नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर
तीन दिवसीय नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर.
श्री. विनय कारगांवकर, अपर पोलीस महासंचालक (ना.ह.सं.). महाराष्ट्र राज्य, मुंबई हे दिनांक 17/10/2022 ते दिनांक 19/10/2022 रोजी पावेतो नंदुरबार जिल्ह्याचे वार्षिक तपासणी भेटीसाठी आज आलेले आहेत. सदर भेटी दरम्यान त्यांनी आज रोजी नवापूर पोलीस ठाणे येथे भेट दिली. नवापूर पोलीस ठाणे येथे त्यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांनी स्वागत केले.
नवापूर पोलीस ठाण्याची भेट घेतेवेळी त्यांनी पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. पोलीस arrrrमध्ये पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी उभारण्यात आलेले वाचनालय त्याचप्रमाणे व्यायाम शाळा व पोलीस ठाण्याचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दिनांक 18/10/2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी दरबार घेतील. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेसोबत जिल्ह्याचा गुन्हे आढावा घेवून जिल्हा पोलीस दलाला मार्गदर्शन करतील. नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करून जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल व नागरिकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल मुळ तक्रारदारांना त्यांच्या हस्ते परत करण्यात येतील.
दिनांक 19/10/2022 रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राला भेट देवून दुरक्षेत्राची तपासणी व त्यानंतर शहादा पोलीस ठाणे येथे भेट देवून शहादा पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी श्री. विनय कारगांवकर, अपर पोलीस महासंचालक (ना.ह.सं.), महाराष्ट्र राज्य, मुंबई हे वाचनालयाचे उद्घाटन करणार आहेत तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या कार्यालयाची पाहणी करतील.
Tags:
शासकीय