नंदुरबार जिल्ह्य परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी नवापूरच्या सौ.संगिताताई भरत गावित यांची बिनविरोध निवड.....
नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज येथील जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती पदाची निवड होती त्यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नवापूरच्या संगीताताई भरत गावित,तर समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी तसेच उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी शिवसेना (उबाठा) चे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान, काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एकाही सदस्याने नामांकन दाखल केले नाही तसेच सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे सर्व सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. सौ.संगीताताई भरत गावित यांचे या स्तुत्य निवडी बद्दल नवापूर शहर व परिसरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags:
यश/ निवड