ऐन सुट्टीत दहावी बोर्डाचे फॉर्म भरण्याचा फतव्यामुळे पालकांसह शिक्षक त्रस्त.....

ऐन सुट्टीत दहावी बोर्डाचे फॉर्म भरण्याचा फतव्यामुळे पालकांसह शिक्षक त्रस्त.....
नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळाने मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आवेदनपत्र सादर करण्याच्या तारखा ऐन दिवाळीच्या सुट्टीत दिल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
   परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळाने सुट्टीच्या कालावधीतच
आवेदन पत्र भरण्याची तारीख जाहीर करून शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा खेळखंडोबा केला आहे. कोरोना काळात शिक्षकांना प्रकारची सुट्टी नव्हती. त्यानंतर नेहमीच सुरू झालेल्या शाळांमुळे शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण असताना महामंडळाने सुट्टीच्या तोंडावरच दहावीचे आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करून सर्वांचाच गोंधळ उडवून टाकला आहे. १० वी आहे. फॉर्म भरणेची तारीख १९ आक्टोबर २०२२ ते १० नोव्हेबर २०२२ आहे. दिवाळी सुट्टीनंतर शाळा ९ नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यामुळे एका दिवसात ऑनलाईन विद्यार्थीचे फॉर्म भरून होऊ शकत नाहीत. याचा विचार करुन महामंडळाने दिवाळीत दहावीचे आवेदन पत्र भरून घेण्याच्या कामाला स्थगिती देऊन सुट्टीनंतर आवेदन पत्र भरून घ्यावीत अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग व शिक्षकांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post