नंदुरबार नगरपालिकेचा सभागृहाला
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
नंदुरबार नगरपालिकेने नवीन इमारत तयार झाली असून या इमारतीमध्ये मुख्य व प्रशस्त सभागृह तयार करण्यात आले आहे. १००सदस्य बसू शकतील एवढे सभागृह असून, संपूर्ण वातानुकूलित आहे. याठिकाणी नैसर्गिक प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. विधिमंडळाच्यासभागृहाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या सभागृहाला माजी केंद्रीय राज्यमंत्री लोकनेते स्व. माणिकराव होडल्या गावित असे नामकरण करण्यात येणार आहे. जिल्हा विकासात माणिकराव गावित यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण स्वतः व नंदुरबार पालिकेने हा निर्णय,घेतला असल्याचेही चंद्रकांत रघुवंशी यांनी आज नवापूर येथे दिली.
Tags:
राजकीय