ग्रामपंचायत निवडणूकीमुळे
नंदुरबार, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा):
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 45, अक्राणी तालुका 25, तळोदा तालुका 55 व नवापूर तालुक्यातील 81 अशा एकूण 206 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 16 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदान तर सोमवार 17 ऑक्टोंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या गावांत ग्रामपंचायत निवडणूका असतील त्या मतदार क्षेत्रात रविवार 16 ऑक्टोंबर, 2022 रोजी मतदानाच्या दिवशी तसेच सोमवार 17 ऑक्टोंबर 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Tags:
राजकीय