शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी असमान निधी योजनेसाठी
नंदुरबार, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा): भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेअंतर्गत सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहायच्या विविध योजना राबविण्यात येत असून या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव 28 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा.वळवी यांनी केले आहे.
या असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसीत करण्यासाठी, महोत्सवी वर्ष जसे 50,60,75,100,125,150 वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमासाठी, तसेच बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम, अटी व अर्जाचा नमूना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजुला, ग्राहक न्यायमंच कार्यालयासमोर, टोकरतलाव रोड नंदुरबार येथे संपर्क साधून ग्रंथालयाीन वरील पैका एका योजनेसाठीचा प्रस्ताव इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.असे श्री.वळवी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
Tags:
शासकीय