साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक......

साहसी क्रिडा  पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक.....
नंदुरबार, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा): गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकाराचे साहसी  पर्यटन उपक्रम आयोजित करण्यासाठी नोंदणी  आवश्यक असल्याने साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या व्यक्ती, संस्थानी  नोंदणी करण्याचे आवाहन, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई- राठोड यांनी केले आहे.
   गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकाराचे साहसी  पर्यटन उपक्रम अनेक ठिकाणी आयोजित केले जातात. यामध्ये संबंधित आयोजक हे उपक्रम आयोजित करण्याबाबत प्रशिक्षित असणे आवश्यक असून त्यांच्याकडे असणारे साहित्य दर्जेदार असावे, तसेच उपक्रम आयेाजित करतेवेळी पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
   यासाठी असे साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्था, व्यक्तींनी www.maharashtratourism.gov.in  संकेतस्थळावर  नोंदणी करावी. सुरुवातीला तात्पुरती नोंदणी करावी, यासाठी शुल्क पाचशे रुपये प्रति साहसी प्रकार असून त्यानंतर 1 वर्षांनंतर अंतीम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. नोंदणी न करता, साहसी उपक्रम आयेाजित केल्यास 25 हजार रुपये दंड, साहित्य जप्ती, तसेच आयेाजकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार,गोल्फ क्लब मैदान जवळ, नाशिक 422001  (दुरध्वनी क्रमांक 0253-2995464/ 2970049 ) तसेच ddtoruism.nashik-mh@gov.in या ईमेलवर संपर्क साधु शकता.

Post a Comment

Previous Post Next Post