आज बडौदा येथील अ.भा. शिंपी समाजाचे विश्वस्त व उद्योजक मा.मदनशेठ पवार यांचा जन्म दिनानिमित्त त्यांचा कार्यगौरव करणारा सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात लेख........
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
नांव : श्री मदन नथ्थू पवार, बडौदा
जन्म तारीख: २६ /१०/१९५२
शिक्षण (B.sci chemistry (gold medalist,pune university)
व्यवसाय: Chemical Factory Baroda gujarat
स्वतःनेहमीच सामाजिक कार्यासाठी जे असतात तयार,
भूषविलेली पदे:- विश्वस्त अ.भा. क्षत्रिय अहिर शिंपी समाज सामाजिक कार्य: शिंपी समाजातील दानशूर व्यक्ती म्हणून समाजात मा. मदनशेठ पवार यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते कारण प्रत्येक ठिकाणी तन, मन, धनाने व उदार हाताने समाजाला मदती साठी नेहमीच तत्पर असतात बडौदा येथे अस्तित्वात असलेल्या समाज कार्यालयात त्यांचा सिंहाचा वाटा असून आता पर्यंत सर्वाात जास्त दान तर समाजाला दिले आहे व जवळजवळ ४० लाख रूपयाची मदत संपूर्ण देशासह परदेशातून मिळवून देणारे व्यक्तीमत्व मा. मदनजी पवार आणि सहकार्ययांनी मिळवून दिली म्हणूनच मदन पवार हे नांव अतिशय सन्मानाने व आदराने घेतले जाते समाज सेवा करतांना कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आपले काम करित जाणे व समाजपयोगी पडणे हाच उद्देश
तगेल्या २० वर्षांपासून असून शिंपी समाजाला गुजरात राज्यात OBC संवर्गाचे फायदे मिळत नव्हते त्यासाठी लढा देेत असून व शेवटी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न् शिल आहेत व अजूनही हा लढा सुरूच आहे कारण या बदलावाचा गुजरात राज्यातील समाजाबांधवाच्या मुलां मुलिंना शिक्षणासाठी फायदा होईल व समाजातील युवक/ युवती देखील आता मोठ्या पदावर कार्य करू शकेल तसेच समाजबांधवांंना छोटया मोठ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून इतर प्रवर्गासाठी मदत मिळेल याचा फायदा आज जरी फक्त शिपी आडनाव असलेल्या समाजबांधवाना होणार याच्यासाठी प्रयत्नरत असून.या कार्यासाठी त्यांना अहमदाबाद, बडोदा, सुरत येथील अध्यक्ष व पदाधिकारी मदत करत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने थैमान सुरू होते त्या काळात सुध्दा न डगमगता त्यांनी आपले समाजकार्य व सेवा निरंतर सुरू ठेवले व न डगमगता सरळ हाताने मदत करत गेले.कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे मानतात.
म्हणूनच म्हणतात -
बोले तैसा चाले
त्याची वंदावी पाउले
हे वाक्य त्यांच्या समाजकार्याला तंतोतंत जुळत असून अशा या दिर्घदृष्टि समाजसेवकांना जय नामदेव व पुढील वाटचालीस हार्दिक सत्यप्रकाश न्युज परिवारातर्फे शुभेच्छा.

Tags:
व्यक्तीविशेष