उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबारात ..........
नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा मिनीट टू मिनीट दौरा जाहीर झाला आहे. ना.शिंदे हे उद्या दि.२९ रोजी सकाळी १०.४० वाजता नंदुरबारात दाखल होणार असून ११ वाजता नंदुरबार नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उद्या दि.२९ ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असा- दि.२९ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.४० वाजता ना.शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावरील हेलीपॅड येथे आगमन होईल.सकाळी १०.४५ वाजता नंदुरबार पोलीस कवायत मैदान येथे आगमन होईल. तेथे त्यांना मानवंदना देण्यात येवून स्वागत केले जाईल. सकाळी ११ वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.सकाळी ११.२० वाजता त्यांचे मोटारीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराकडे प्रयाण होईल. ११.३० वाजता सत्कार, मानपत्र व मान्यवरांच्या मनोगत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊसकडे प्रयाण व राखीव. दुपारी १.१५ वाजता गजमल तुळशिराम पाटील मैदानाकडे मोटारीने प्रयाण. तेथे दुपारी १.३० वाजता जाहीर सभेला उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता महाविद्यालयाच्या मैदानावरुन मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. दुपारी ३.१५ वाजता हेलिकॉप्टरने धुळ्याकडे प्रयाण होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Tags:
राजकीय