नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातपरिवर्तना चा निर्धार,आता काम करणाऱ्या व्यक्तीलाच संधी देण्याचा मान्यवरांचा सुर, भा ज प च्या शुभांगी ताई पाटील यांच्याकडून पदवीधर मतदार नोंदणी ला सुरवात........

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातपरिवर्तना चा निर्धार,आता काम करणाऱ्या व्यक्तीलाच संधी देण्याचा मान्यवरांचा सुर, भा ज प च्या शुभांगी ताई  पाटील यांच्याकडून पदवीधर मतदार नोंदणी ला सुरवात.....
     धुळे सत्यप्रकाश न्युज 
     नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या शासकीय नोंदणी ला दि 01/10/2022 पासून विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये,सर्व तालुक्यात झाली आहे.
           त्या नुसार महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष  तथा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार,भा ज प च्या शुभांगी ताई पाटील यांनी काल धुळे येथे स्वतः मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन भा ज प  पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदार नोंदणी ला सुरुवात केली. 
        या प्रसंगी शुभांगी ताई पाटील यांच्या सोबत भाजप च्या महिला आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री ताई अहिरराव, ओ बी सी मोर्चा च्या वैशाली ताई शिरसाठ, धुळे महानगर पालिकेच्या नगरसेविका आरती ताई पवार,पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख यशवंत जी येवलेकर  व पवन जी जाजू, श्री अरुण जी पवार, दै पोलिस शोध चे संपादक प्रा जसपालसिंह सिसोदिया सर,आण्णासाहेब खेमणार, भारत भाऊ, वसीम सर, बेग सर, मीनाक्षी ताई पाटील, अजय महाजन सर एन डी पाटील सर, ए जी पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते , या वेळी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या सह जयश्री ताई अहिरराव, अरुण पवार यांनी तहसीलदार शिंदे साहेबांच्या सोबत नोंदणी प्रक्रिये बाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी चर्चा केली.
     *तसेच नाशिक विभागातील 54 तालुक्यात आज शुभांगी ताई पाटील यांच्या महाराष्ट्र टीचर्स  असोसिएशन व स्टुडंट्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कडून विविध तालुक्यात देखिल नोंदणी ला प्रारंभ करण्यात आला ज्या मध्ये नाशिक जिल्हा जळगाव जिल्ह्यात ,अहमदनगर जिल्ह्यात विविध तालुक्यात नोंदणी ला प्रारंभ करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post