नंदुरबार पोलिसांनी फूलवले अनाथ मुलांचा चेहर्यावर हास्य................... दोन वर्षांनंतर दिवाळी साजरा करण्याचा घेतला आनंद.....
नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोली सांनी दिवाळीत अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांचेसोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांचेसोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणाऱ्या चेहऱ्यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती. अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्डे भेट दिली.कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्डे लावण्यात येणार आहेत.
आपणास तसेच आपल्या सत्यप्रकाश न्यूज चॅनेलचा सर्व स्टाफ यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
ReplyDelete