नंदुरबार- सत्यप्रकाश न्युज
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच नंदुरबार शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी नंदनगरी सज्ज झाली असून ठीक ठिकाणी स्वागत फलके लावण्यात आले आहेत तसेच शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या धुळे चौफुलीवर आकर्षक रांगोळी काढण्यात आली असून अवघ्या काही वेळेतच नंदनगरीत मुख्यमंत्र्यांची आगमन होईल यावेळी रस्त्याच्या कडेला उभे राहून अनेक नागरिक मुख्यमंत्र्यांना हात उंचावून स्वागत करतील म्हणून रस्त्याच्या कडेला देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात असून मुख्यमंत्र्यांच्या दौरा मार्ग दरम्यान विविध शुभेच्छा फलके लावण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच नंदुरबार शहरात येत असून नंदनगरीच्या भव्य दिव्य पालिका इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. नंदुरबार पालिकेला देखील आकर्षक सजविण्यात आले असून उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा होणार आहे या दौऱ्यानिमित्त नंदुरबारातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यात आल्याने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली पासून ते अंधारे चौक विरल विहार खोडाईमाता रोड, आमदार कार्यालय परिसर नगरपालिका परिसर या भागातील रस्त्यांची प्रामुख्याने स्वच्छता झाल्याने जणू रस्त्यांचे भाग्य उजळल्याचे दिसून येते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून खडा पहारा ठेवला आहे.
Tags:
राजकीय