एकता दौड मध्ये तहसिलदार मंदार कुलकर्णि सह अधिकाऱ्यांनी घेतला सहभाग....

एकता दौड मध्ये तहसिलदार मंदार कुलकर्णि सह अधिकाऱ्यांनी घेतला सहभाग..... 
 नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक मराठी हायस्कूल व गुजराती हायस्कूल, श्रीमती चोखावाला इंग्लिश स्कूल, मराठी प्राथमिक, प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड काढण्यात आली. दौडला तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी हिरवी झेंडी दाखविली.
  या प्रसंगी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, गटशिक्षणाधिकारी आर. बी. चौरे, प्राचार्य मिलिंद वाघ, प्राचार्य संजय जाधव, विस्तार अधिकारी रेखा पवार आदींसह सर्व शाळा उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय एकता दिवस शपथ
  श्री. अहिरे यांनी उपस्थितांना दिली. बॅण्ड पथकाच्या मदतीने एकता दौडला सुरवात करण्यात आली. विद्यार्थी, मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, या सर्वांनी गांधी पुतळ्यामार्गे शीतल सोसायटी, जलाराम मंदिर, शिफा हॉस्पिटलमार्गे, स्वस्तिक दाल मिल, सार्वजनिक मराठी हायस्कूल, सार्वजनिक हायस्कूलच्या प्रांगणात एकता दौडचा समारोप करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post