नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील बीएपीएस स्वामीनारायण संस्था संचलित श्री स्वामीनारायण संस्कार धामात दीपावली पर्वनिमित्त अन्नकूट महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था संचलित शहरातील साई नगरातील स्वामीनारायण संस्कार घामात दरवर्षी दीपावली पर्वनिमित्त लाभ
पंचमीच्या दिवशी अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात येत असतो. परमपूज्य महंतस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने अन्नकुट उत्सवासाठी स्वामीनारायण सत्संग मंडव्याच्या सदस्यांनी घरून आणलेल्या ७५ प्रकारचे मिष्ठान्न तयार केलेल्या पदार्थांची आकर्षक मांडणी करून भगवान स्वामीनारायण यांना नैवेद्य दाखवण्यात आले. शहरातील असंख्य भाविकांनी यावेळी हजेरी लावली. यावेळीमंडळ संचालक निरीक्षक प्रा. आर. आर. पाठक यांनी अन्नकूट महोत्सवाचे महत्त्व सांगितले. समीर प्रजापत, मयूर जाधव यांनी भोजन थाळ गीत सुरेल आवाजात गायलीत. मंदिराचे पुजारी विनोद पांडे यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मंडळ निरीक्षक प्रा. आर. आर. पाठक, कमलेश अग्रवाल, संजय अग्रवाल, हरिलाल प्रजापत, रघुनाथ सोनार, भटू जाधव, किशोर प्रजापत, महेंद्र जाधव, जितेंद्र सोनी, राकेश प्रजापत, अतुल प्रजापत, मनोज पगारे, राजेंद्र जाधव, विशाल प्रजापत, निरव प्रजापत, गौतम राणा आदींसह महिला मोठ्या संखेने भक्त उपस्थित होते.
Tags:
धार्मिक