राज्यस्तरीय काव्यमहोत्सवातून व्यक्त झाले १५० हून अधिक कवी.....

राज्यस्तरीय काव्यमहोत्सवातून व्यक्त झाले १५० हून अधिक कवी...
सोलापूर  सत्यप्रकाश न्युज 
         "लेखन ही अतिशय प्रभावी अशी कला आहे. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल अशा कथा, कविता, कादंबरी, ललित, गझल अशा प्रकारातून व्यक्त झालं पाहिजे. लिहिलेलं कधीही वाया जात नाही. उलट त्यातून इतरांना प्रेरणाच मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने साहित्याच्या शब्दातून व्यक्त झालं पाहिजे अशी अपेक्षा इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी प्राध्यापक. ए.डी जोशी यांनी भावना व्यक्त केली." काव्यप्रेमी शिक्षक मंच या साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव रविवारी दि.३० ऑक्टोबर रोजी इंडियन मॉडेल स्कूल येथे संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
      सकाळी ९:३० वाजता दौंडचे सुप्रसिद्ध गझलकार बबन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे सुप्रसिद्ध गझलकार मसूद पटेल यांच्या शुभहस्ते सदर काव्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. सदर प्रसंगी डॉ.इ.जा.तांबोळी (प्राचार्य, सोशल महाविद्यालय), सीमाताई भांदर्गे (साहित्यिका, अमरावती) व राष्ट्रपाल सावंत (साहित्यिक, रत्नागिरी) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     काव्य प्रभात (काव्यप्रेमी, पदाधिकारी कवी संमेलन) या सत्रानंतर डोंबिवलीचे प्रसिद्ध कवी गझलकार विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गझल बहार  सत्र संपन्न झालं सदर प्रसंगी अमरावतीचे कवी विजय बिंदोड व मिरजेच्या कवयित्री जस्मिन शेख या उपस्थित होत्या.
     दुपारी बारा वाजता काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके यांच्या अध्यक्षतेखाली आकाशवाणी सोलापूरचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी यांच्या शुभहस्ते "काव्यप्रेमी दिवाळी अंक २०२२' चे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर काव्यप्रेमीच्या सांगली जिल्हा अध्यक्षा सौ.जस्मिन शेख व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाबू घाडीगांवकर यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रा.ए.डी.जोशी यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन ''काव्यप्रेमी जीवन गौरव पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. सदर प्रसंगी राजेंद्र दासरी "काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने मराठी साहित्य सेवा उत्तम रितीने होत असून नवोदित व प्रख्यात साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाली आहे. काव्यप्रेमी शिक्षक मंच ऐवजी काव्यप्रेमी साहित्य मंच असे नामकरण व्हावे." अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सोलापूर दैनिक पुननगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, काव्यप्रेमीचे राज्यसचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, राज्य समिती सदस्य राष्रपाल सावंत, जया नेरे, संदीप वाघोले, सोलापूर शहराध्यक्ष महेश रायखेलकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष युवराज जगताप व पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कालिदास चवडेकर यांनी प्रास्ताविकेत प्रा.ए.डी. जोशी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा काव्य महोत्सव घेण्यात आल्याचे सांगितले आनंद घोडके यांनी अध्यक्षीय भाषणात काव्य महोत्सवाच्या मागील संकल्पना स्पष्ट केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोत्स्ना घोडके यांनी केले. 
       दुपारच्या सत्रात विशाल अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली ''काव्यगंध'', संदीप वाघोले यांच्या अध्यक्षतेखाली "काव्य गुलमोहर", सौ.जया नेरे यांच्या अध्यक्षतेखाली "गझल गंध" सत्र संपन्न झाले. यावेळी सत्रनिहाय व्यासपीठावर रणजित पवार (पुणे), खुशाल गुल्हाणे,(अमरावती), हणमंत पडवळ (धाराशिव), वर्षा भांदर्गे (अमरावती), प्रा. संतोष बोंगाळे (सातारा), अश्विनी धाट (धाराशिव), द.ल.वारे (बीड) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     संध्याकाळी ६ वाजता सोलापूर शहर व जिल्ह्यातील कवींसाठी आयोजित केलेल्या "कविता सोलापुरी" या सत्राचे उद्घाटन ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.नसिम पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी व्यासपीठावर पद्माकर कुलकर्णी, मारूती कटकधोंड, राजेंद्र भोसले, गिरीश दुनाखे, रमेश खाडे, वैशाली अघोर, रामचंद्र धर्मसाले, रेणुका बुधारम, दुर्गा जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. काव्य महोत्सवातील विविध सत्रांचे  सुत्रसंचलन गायत्री सुरडीकर, मनिषा रायजादे, पोपट माळी, खाजाभाई बागवान, जयश्री सुतार, श्रीमंत कोळी, महेश रायखेलकर व लक्ष्मण काटेकर यांनी केले.
     सदर काव्य महोत्सवात राज्यभरातील १५० हून अधिक कवी सहभागी झाले होते. महोत्सव यशस्वी होण्यासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या सोलापूर जिल्हा व शहर शाखेतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने राज्यस्तरीय काव्य महोत्सवात शिक्षण महर्षी यांचा अमृत महोत्सव निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर आकाशवाणीचे राजेंद्र दासरी, आनंद घोडके, कालिदास चवडेकर, कृष्णा शिंदे, राष्ट्रपाल सावंत, संदीप वाघोले, जया नेरे  महेश रायखेलकर व  इतर

Post a Comment

Previous Post Next Post