दुय्यम शिधापत्रिका मोहिमेत रेशनकार्ड बदलून घेण्याचे तहसिलदार मंदार कुलकर्णि यांचे कार्डधारकांना आवाहन....
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरातील सर्व शिधापत्रिका धारकांना कळविण्यात येते की, जर त्यांची शिधापत्रिका जीर्ण/खराब / फाटली असेल तसेच हरवली असेल तर अशा शिधापत्रिका धारकांनी दुय्यम शिधापत्रिका मिळण्यासाठीचा अर्ज दि.02.11.2022 ते दि.07.11.2022 या कालावधीत तलाठी कार्यालय, नवापूर येथे जमा करावा. आलेल्या सर्व अर्जाची तपासणी करून दुय्यम शिधापत्रिका वितरीत करण्याचे काम दि. 15.11.2022 नंतर करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अर्जाचा नमुना मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जासोबत जीर्ण / खराव फाटलेली शिधापत्रिका जमा करणे आवश्यक राहील. तसेच दुय्यम शिधापत्रिकेसाठीची शासकीय फी (पिवळ्या कार्डसाठी- 20.रु. व केशरी कार्डसाठी रु.) भरणे आवश्यक राहील. तरी शिधापत्रिकासाठी नागरिकांनी कार्यालयीन वेळेत तलाठी कार्यालय, नवापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार मंदार कुलकर्णि यांनी केले आहे.
Tags:
शासकीय