कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर (वाकीपाडा) येथे पालक परिषद, तथा माता पालक सभा संपन्न.......

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर (वाकीपाडा) येथे पालक परिषद, तथा माता पालक सभा संपन्न.......
         नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
      दि. 17/10/2022     वार सोमवार रोजी,     कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर (वाकीपाडा) येथे पालक परिषद, तथा माता पालक सभा घेण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.ज्योती कापुरे व गृहप्रमुख श्रीम. मनीषा नाईक यांनी सभेत खालील विषयांवर चर्चा केली,  विषय 
1) दिवाळी सुटीतील अभ्यासिका तथा गृहपाठ, 
 2) बँक खाते आधार लिंक,
 3) शाळेच्या नवीन इमारत व तेथील भौतिक सुविधा,
4) 9 ते 12 वि पर्यन्त वसतिगृह बाबत चर्चा,
5) आजपावेतो विविध स्पर्धा, तथा विविध स्पर्धेत क्रमांक प्राप्त विध्यार्थीनी बाबत पालकांना माहिती देण्यात आली              6) मुलींचे आरोग्य,
7) महिन्याच्या पहिल्या रविवारी पालक भेट,
8) वसतिगृहाच्या नियमावली
9) आपले विध्यालय हे आदर्श स्कूल मध्ये समाविष्ट होण्याबाबत पालकांना माहिती
10) विद्यावेतन करिता 100% खाते उघडण्याबाबत चर्चा अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.          या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले,, पालक अध्यक्ष, श्री जगदीश वळवी व     माता पालक अध्यक्ष श्रीम. कुंताबाई गावित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,  दिपावलीच्या सर्व पालकांना व विध्यार्थीनींना मुख्याध्यापक व सर्व staff कडून शुभेच्छा देण्यात आल्या.      सर्व  पालकांना  अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, गृहप्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. पालक तथा माता पालक यांचे आभार व  कार्यक्रमाची सांगता श्री.योगेश पाटील यांनी केली.
--------------------------------------------  यशस्वी विद्यार्थ्यांनीच सन्मान 
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर येथील इयत्ता 8 वि व 9 वि या दोन्ही गटातील  विध्यार्थीनीचे भूमिका अभिनय व लोकनृत्य जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय यश प्राप्त केले,,,,,या स्पर्धेत  मुख्याध्यापक, गृहप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर या सर्व प्रणालीचे विध्यार्थीनीचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांनीच अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post