नवापूर महाविद्यालयातर्फे स्वच्छ भारत . अभियान अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय आणि बस स्टँड परिसराची स्वच्छता.....

नवापूर महाविद्यालयातर्फे स्वच्छ भारत महाविद्यालयातर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय आणि बस स्टँड परिसराची स्वच्छता
......
         नवापूर  सत्यप्रकाश न्यूज 
      महाविद्यालयातर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय आणि बस स्टँड परिसराची स्वच्छता....
नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे नियोजन केले. 
     सुरुवातीस दि.११ऑक्टोबर रोजी ३० रा से यो स्वयंसेवकांच्या पथकाने नवापूर उप जिल्हा रुग्णालय येथील सुमारे ३० किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले व महाविद्यालयातर्फे नगरपालिका येथे जमा केलें. या उपक्रमासाठी उप जिल्हा रुग्णालय नवापूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ शशिकांत वसावे, श्री कैलास माळी यांच्या सह रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.तद नंतर मा मंत्रालय भारत सरकार यांच्या दि.19 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता व प्लास्टिक मुक्त दिवस म्हणून राबविण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार प्राचार्य डॉ ए.जी.जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली बस आगार प्रमुख राजेंद्र अहिरे साहेब, जगताप साहेब आणि नवापूर नगर पलिकेतील आरोग्य खात्याचे श्री अशोक धंडोरे यांच्या सहकार्याने बस स्टँड परिसराची स्वच्छता करण्यात आली.. 
गोळा केलेले प्लास्टिक आणि कचरा नगर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे सोपविला गेला.
कचरा संकलन करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहील यासाठी हातमोजे देण्यात आले. वापरलेले हातमोजे कचऱ्यामध्ये जमा केले.शेवटी सर्व स्वयंसेवकांनी डेटॉल वापरून हात स्वच्छ केले.
यावेळी रासेयो एकाकचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ सुरेखा बनसोडे, प्रा एकनाथ गेडाम आणि प्रा जगदीश वसावे यांनी स्वयंसेवकांना स्वच्छते बाबतीत मार्गदर्शन केले. हे स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ सुरेखा बनसोडे व डॉ विनायक वसईकर यांनी परिश्रम घेतले. या मोहिमेत महाविद्यालय रा से योमधील बहुसंख्य स्वयंसेवक  सहभागी झाले त्यांनी साधारणतः ४० किलोग्रम एवढे प्लॅस्टिक गोळा केले.

Post a Comment

Previous Post Next Post