नवापूर-सत्यप्रकाश न्यूज
येथील आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी बहुसंख्य स्वयंसेवकांच्या उपस्थिती मधे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामधे विद्यार्थ्यानी श्रमप्रतिष्ठा जपत संस्थेचे ऑफिस,महाविद्यालयाचे प्रांगण, एन एस एस विभाग आणि डी एड कॉलेज प्रवेशद्वार परिसर स्वच्छ केला...
दुसऱ्या सत्रात फिट इंडिया फ्रीडम रन या अभियाना अंतर्गत स्वयंसेवकांनी १०० मि. धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला
मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी चार गटात प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले...
सदर स्पर्धेचे उद्घाटन क ब चौ उ म वि जळगाव यांनी पुरस्कृत केलेल्या उत्कृष्ट कार्यालयीन अधिक्षक श्री मनोज चौधरी यांच्या हस्ते झाले. एकूण ९० स्वयंसेवकांनी अभियानात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ मंदा गावित यांनी स्वयंसेवकांना निरोगी आणि सदृढ राहण्याचे आवाहन केले.
अभियान यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ ए. जी. जयस्वाल, उपप्राचार्य वाय जी भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
फिट इंडिया फ्रीडम रन अभियान राबविण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर डी पाटील, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे, प्रा. एकनाथ गेडाम, प्रा. जगदीश वसावे आणि डॉ विनायक वसईकर यांनी योगदान दिले.
Tags:
शैक्षणिक