दीपावली सुट्टीमुळे शिक्षक मतदार नोंदणी मुदतवाढ मिळावी म्हणून कोकण आयुक्तांना निवेदन.......

दीपावली सुट्टीमुळे शिक्षक मतदार नोंदणी मुदतवाढ मिळावी म्हणून  कोकण आयुक्तांना निवेदन.........
ठाणे सत्यप्रकाश न्यूज 
 दीपावली सुट्टीमुळे शिक्षक मतदार नोंदणी साठी  मुदतवाढ  होण्यासाठी  ज्ञानेश्वर म्हात्रे ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग, उपाध्यक्ष:- महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ तथा अध्यक्ष:- ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ) यांनी आज दि  ७/१०/२०२२ रोजी एक निवेदन मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग, तथा निवडणूक निर्णय अधिकारी कोकण भवन, नवी मुंबई, बेलापूर. यांना कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी मुदतवाढ मिळणेबाबत प्रत्यक्ष  निवेदन सादर केले आहे.
      मतदार नोंदणी प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली आहे. व शेवटचा दिनांक ७ नोव्हेंबर २०२२
 पर्यंत आहे. परंतु दीपावलीची सुट्टी २२ ऑक्टोबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. दरम्यान अनेक शाळांना व शिक्षक मतदार बंधू भगिनी यांना नोंदणी पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच सर्व शाळांमध्ये सत्र परीक्षा चालू झाली आहे. दीपावलीची सुट्टी व सत्र परीक्षा यांचा विचार करून कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणीची मुदत वाढ मिळावी यासाठी आपले आधारवड आदरणीय. श्री.  ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षक सेना कार्यकर्ते व पदाधिकारी मा. श्री. भास्कर देशमुख सर (शिक्षक सेना अध्यक्ष नवी मुंबई ऐरोली विभाग) व मा. श्री . विकास वाघमारे  सर (शिक्षक सेना उपाध्यक्ष बेलापूर विभाग )यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे.
     मतदार बंधू भगिनींनो मतदार नोंदणी फॉर्म साठी पाठीमागे पांढरा  पडदा  असलेला फोटो आवश्यक आहे या संबंधी मी स्वतः आयुक्त साहेबांकडे चर्चा केली आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे कामकाज चालू राहील असेच सांगण्यात आले आहे. बंधू आणि भगिनींनो लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रियेचा आत्मा असलेली मतदार नोंदणी या साठी आयोगाने सुचविल्याप्रमाणेच फोटो चिकटवण्याचे कार्य पार पाडावे 
      निवडणूक मतदार नोंदणी पात्र शिक्षक तपासणीसाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व यांचे कडील माहिती व मार्गदर्शन तसेच यु-डायस पोर्टल प्रणाली तपासले जाईल असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. प्राथमिक विभागातील शिक्षक बंधू भगिनी यांची मतदार नोंदणी करू नये अन्यथा आयोगाकडून होणारी कारवाई अपरिहार्य आहे याची नोंद घ्यावी  
      *आज प्रत्यक्ष भेटून माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग , तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे  समवेत मा. श्री .ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आदेशानुसार समन्वय साधून चर्चा करण्यात आली आहे.
 अशी माहिती श्री. भास्कर देशमुख सर
   (शिक्षक सेना अध्यक्ष नवी मुंबई एरोली विभाग) यांनी दिली.


🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

Post a Comment

Previous Post Next Post