प्रिय वाचक सत्यप्रकाश न्युज portal आपल्या साठि घेऊन येत आहे सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात नवापूर शहराचे माजीनगराध्यक्ष ,उद्योगपती व नवापूर एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष - मा.श्री विपिनभाई चोखावाला यांचा 85 वा जन्म दिनानिमित्त त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख........

प्रिय वाचक सत्यप्रकाश न्युज portal आपल्या साठी घेऊन येत आहे सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष. या सदरात नवापूर शहराचे माजीनगराध्यक्ष,  उद्योगपती व नवापूर एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष -
     मा.श्री विपिनभाई चोखावाला यांच्या 85 वा जन्म दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख.....
 नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    शहरातील चौफेर विकास कामे, आजपासून 10 ते 15 वर्ष झालीत तरी  ती कामे आज देखील चर्चेत असून त्या काळात झालेले काम तदनंतर शहरवासियांना पहावयास मिळाले नाहीत आणि पुढे कदाचित मिळणार देखील नाहि. अशा अभिमानाने शहरात चर्चा असते.
      त्याकाळी स्वच्छ व सुंदर काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच नवापूर शहरातील विकास पुरूष आदरणीय विपीनभाई चोखावाला, ज्यांना शहरातील लहानांपासून  मोठ्यांपर्यंत आदराने व सन्मानाने भाई नांवाने संबोधतात व भाई देखील तेवढ्याच आदराने त्यांचा सन्मान करतात. म्हणून आलेला माणूस कधी नाराज झालेला दिसत नाही.
       आदरणीय विपीनभाई यांचा जन्म नवापूर दि.22/10/1937 रोजी प.पू.रंगअवधूत महाराजांचे निस्सीम भक्त श्री मंगलदास चोखावाला व सौ.सविताबेन मंगलदास चोखावाला यांचा परिवारात झाला.
      बालपणापासून अत्यंत हुशार व शिक्षणात निपुण असलेल्या विपीनभाई याांचे प्राथमिक, माध्यमिक,शिक्षण नवापूर येथील कलाल गल्लीत असलेल्या डुबास बिल्डींग मध्ये झाले. जिथे आज संस्थेची सार्वजनिक प्राथमिक शाळा भरते. तदनंतर महाविद्यालयीन 
शिक्षण B.Com.व  L.L.B. मुंबई येथे घेतल्यानंतर M.B.A.हि पदवी New York University, America येथे  झाले.
   त्याकाळी  उच्च शिक्षण घेऊन शहरात वास्तव्य न करता आपल्या जन्मभूमीचे कर्मभूमीत रूपांतर करून नवापूर शहरात वास्तव्यास सुरूवात केली.
राजकीय प्रवास - विदेशातील शिक्षणानंतर भाईंनी आपल्या रेंटियो तूवरदाळ या उद्योगाला सातासमुद्रापार नेले व सोबत राजकारणात देखील प्रवेश केला. 1967 पासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर 1967 ते 76 पर्यत ग्रामपंचायत सदस्य पासून राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दादासाहेब सुरूपसिंग नाईक साहेब आणि माजी केंद्रीय मंत्री स्व.  दादासाहेब माणिकराव गावित यांच्या सोबत कार्य केले. तदनंतर 1967 ते 76 नवापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदावर कार्य केले. 19976 नंतर 1982 मध्ये  ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्याने त्यांनी 12 वर्ष नगराध्यक्ष व नंतर 2007 पर्यंत नगरसेवक म्हणून काम पाहिले. त्याकाळी निर्माण केलेले रस्ते, नगरपालिका टाऊन हॉल, आणि नगर परिषद कार्यालय इमारत व विविध विकास कामांचा आज देखील बोलबाला आहे त्यांची राजकीय कारकीर्द न भूतो न भविष्यती अशी आहे.
     आज 85 चा वयात देखील आपल्या दिनचर्येत कोणताही बदल न करता वेळेला महत्व देण्यात त्यांची बरोबरी कोणी करणार नाही आज देखील वेळेचे काम वेळेवर करून शहरातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत. 
 शैक्षणिक कार्य - राजकारणाप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा सिंहाचा वाटा असून 1981 मध्ये स्थापन झालेल्या आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेत ते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय मंत्री स्व.माणिकराव गावित यांच्यासोबत 2011 पर्यंत मानद सचिव या पदावर काम पाहिले व संस्थेच्या तालुक्यातील ग्रामीण भागात आश्रमशाळा,हायस्कूल,वरिष्ठ महाविद्यालय,शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करून  ज्ञानदानात आपले योगदान दिले. सोबत कित्येक गरजूंना संस्थेत सेवा करण्याची संधी देऊन रोजगार प्राप्त करुन दिला.
      शैक्षणिक क्षेत्रात एवढया वर न थांबता आपण ज्या संस्थेत शिकलो त्याच संस्थेत त्यांना ज्ञानदान करण्याची संधी मिळाली त्यांनी 1967 पासून नवापूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व त्यानंतर 1999 पासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून आपण ज्या संस्थेत व ज्या इमारतीत शिकलो व मोठे झालो त्याचा त्यांना  अभिमान असून त्या इमारतीत जातीने लक्ष देतात व तिथे होणार्‍या चिमुकल्यांचा कार्यक्रमात जातीने उपस्थित राहतात व त्या चिमुकल्यांमध्ये आपले बालपण शोधतात.
    आज या संस्थेचा प्रसार खूप मोठा झाला असून मराठी,गुजराती,इंग्रजी ,उर्दू माध्यमाचा प्राथमिक पासून उच्च माध्यमिक पर्यतचे शिक्षण दिले जाते तर तालुक्यातील विद्यार्थ्याच्या निवासासाठी निर्माण केलेले ग्रीन हाऊस (जयहिंद छात्रालय) व कस्तुरबा गांधी मुलींचे वसतिगृह उल्लेखनीय आहे.
     आज देखील या संस्थेत शैक्षणिक कार्य करणाऱ्यां शिक्षकाची नियुक्ती हि फक्त आणि फक्त त्याच्या गुणवत्तेवर केली जाते. म्हणून जिल्ह्य़ाबाहेरील अनेक युवक आज शिक्षा दान करत आहेत.   
       तसेच त्यांचा हा प्रवास निरंतर सुरू असून आपल्या परीने आलेल्या व्यक्तीला औषधोपचार, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्यात आर्थिक मदत करत आहेत.
    हे सर्व करत असतांना त्यांना परिवाराची साथ व सहकार्य देखील तेवढ्याच प्रमाणात मिळते धर्म पत्नी आदरणीय सौ.मीराबेन चोखावाला या नेहमीच तत्पर असतात तर कन्या डॉ तेजल व उद्योजक शितल यांच्या देखील तेवढाच सहभाग आहे.
   पुरस्कार- आपल्या व्यवसायाला सातासमुद्रापार नेणाऱ्या भाईना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून यात ABP News, या मराठी वृत्त वाहिने तर्फे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले तर World Sustebilty, 
News 18 तर्फे Leding Food , ABP asmita(गुजराती) तर्फे गुजरातना अनमोल रत्न सह संस्थेला देखील आदिवासी सेवक या राज्य पुरस्कार सह ,वनमित्र पुरस्कार प्राप्त झाला आहे
      अशा या नवापूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व शहरातील युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय मा.श्री विपीनभाई चोखावाला यांना सत्यप्रकाश न्युज व परिवार तर्फे जन्म दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा .

Post a Comment

Previous Post Next Post