महाराष्ट्र शासनातर्फे दिपावली निमित्त मिळणाऱ्या आनंदाचा शिधाजिन्नसाचा आपपल्या रेशन दुकानात जावून घेण्याचा तहसिलदार मंदार कुलकर्णी यांचे आवाहन... नवापूर सत्यप्रकाश न्यूज
महाराष्ट्र शासन,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्र का नूसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना दिवाळी निमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या संचाचे वितरण शहरातील स्वस्त धान्य दूकानात सूरळीत सुरू झाले असून आवघ्या १००रूपयात आनंदाचा शिधा यात १कि साखर १कि चना डाळ १कि रवा १लि तेल वितरीत करण्यात येत आहे या कामी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्री महेशजी शेलार साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री पंकज खैरनार साहेब पुरवठा निरीक्षक श्री दिलीप पाडवी नाना श्री प्रविण मराठे नाना पाॅस मशिन आॅपरेटर सनी गावीत हे वाटपात कूठलेही व्यतेय न येता धान्य दूकानात शिधाजिन्नस पोच करून ती लाभार्थ्यांना पर्यंत सूरळीत वाटप होण्या कामी लक्ष ठेवून आहेत तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी ही सर्वाची दिवाळी गोड व्हावी म्हणून सलग १२ तास दूकाने उघडे ठेवून वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे
लाभार्थ्यांनी वेळत सदर योजनेचा लाभ घ्यावा काही तक्रार असल्यास संबंधित पुरवठा विभागासी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सो श्री मंदार कुलकर्णी साहेब यांनी केले आहे